Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीट खाण्याची योग्य पद्धत काय? योग्य पद्धत कळेल तरच मिळतील त्यातून फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:54 IST

Right way to eat Beetroot : जर नेहमीच बीट खाल्लं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. पण हे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा बीट योग्य पद्धतीनं खाल.

Right way to eat Beetroot :  बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असं कंदमूळ आहे. कारण यात भरपूर पोषक तत्व असतात. लाल रंगाच्या या कंदमूळात प्रोटीन, कार्ब्स, नॅचरल शुगर, फायबर आणि पाणी असतं. भरपूर लोक जेवणासोबत कच्चं बीट खातात किंवा सलादमध्ये खातात. जर नेहमीच बीट खाल्लं तर शरीराला अनेक फायदे मिळतात. पण हे फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा बीट योग्य पद्धतीनं खाल.

जास्तीत जास्त लोक बीट चुकीच्या पद्धतीनं खातात. असा दावा आमचा नाही तर डायटिशिअन भावेश गुप्ता यांचा आहे. भावेश गुप्ता यांच्यानुसार, जर बीट सलाद किंवा ज्यूसच्या रूपात घेत असाल तर आजच बंद करा. कारण बीट खाण्याच्या या चुकीच्या पद्धती आहेत. सोबतच ते सांगतात की, यात आयर्नही खूप कमी असतं. अशात कच्चं बीट खाल्ल्यानं काय होतं ते पाहुयात.

पोट बिघडू शकतं

डायटिशिअननुसार, बीट एक कंदमूळ आहे. जे जमिनीत वाढतं. त्यामुळे यात काही नुकसानकारक व्हायरस, बॅक्टेरिया आणि पॅरासाइट असतात. ज्यामुळे डायरिया, उलटी, फूड पॉयजनिंग इतकंच काय तर गर्भपातही होऊ शकतो.

लिव्हर, किडनी, हृदयासाठी घातक

घातक मायक्रोब्सशिवाय बिटामध्ये हेवी मेटल आणि पेस्टीसाइडही असतात. जे आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव जसे की, लिव्हर, किडनी आणि हृदय डॅमेज करू शकतात. त्यामुळे आधीच या अवयवासंबंधी काही समस्या असेल तर बीट खाऊ नये.

बीट खाण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी तर बीट पाण्यानं चांगलं धुवून घ्या. नंतर त्याची साल काढून उकडून घ्या किंवा शिजवा. असं केल्यानं बिटातील घातक तत्व नष्ट होतात. सोबतच पोटासंबंधी समस्याही होत नाहीत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Best way to eat beetroot for maximum health benefits.

Web Summary : Eating beetroot the right way is crucial for health benefits. Dietician Bhavesh Gupta advises against raw consumption due to potential contamination. Boil or cook beetroot to eliminate harmful elements and prevent health issues like infections or organ damage.
टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स