Join us

सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूरची युक्ती! किवीची सालं काढण्याच्या २ ट्रिक्स, किवी सोला भरभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 08:53 IST

How to Cut a Kiwi : 2 Easy Ways to Cut Kiwi : No more wastage, No more mess A perfect way to cut KIWI : How to peel and cut kiwi in different style : किवीची सालं काढून झटपट कापण्याच्या दोन सोप्या पद्धती पाहा...

'किवी' हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट - गोड फळ. अनेकदा आपण बाजारांत फळांच्या ठेल्यावर विकायला असणारे किवी फळं पाहतो. चवीला आंबट - गोड असणारे हे फळं (How to Cut a Kiwi) खायला सगळ्यांनाचं आवडते. परंतु अनेकदा हे हिरवगार, केसांळ फळं सोलून खायचं कसं हे बऱ्याचजणांना (2 Easy Ways to Cut Kiwi) माहित नसते. याचबरोबर, काहींना हे फळं खायला तर आवडत पण त्यावरची केसाळ सालं काढणं म्हणजे फार कंटाळवाणे काम वाटते(No more wastage, No more mess A perfect way to cut KIWI).

किवी फळावरील केसाळ सालं काढून कुणी सोलून दिलं तर अगदी मिनिटभरात आपण ते फस्त करतो. पण किवी खाण्यापूर्वी त्यावरील केसाळ सालं काढून ते स्वच्छ करण्याचे बोरिंग काम कुणाला आवडत नाही. यासाठीच, सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर याने किवीची सालं अगदी सहज पद्धतीने काढून, किवी कापण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. या दोन सोप्या ट्रिक्सचा वापर करून आपण फारसा पसारा न घालता अगदी मिनिटभरात किवी कापून खाऊ शकतो. सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी किवी (How to peel and cut kiwi in different style) कापण्याच्या कोणत्या दोन सोप्या पद्धती शेअर केल्या आहेत ते पाहूयात. 

किवी कापण्याच्या दोन सहजसोप्या ट्रिक्स... 

सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या chefkunal या इंस्टाग्राम अकाऊंटवरून किवी कापण्याच्या दोन सोप्या ट्रिक्स शेअर केल्या आहेत.

१. सर्वातआधी किवी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर, कापडाने हलकेच पुसून घ्यावी. किवी पुसताना दाब देऊन पुसू नये. आता किवी आडवी धरुन सर्वात आधी पृष्ठभागावरील तळाचा भाग गोलाकार कापून घ्यावा. मग, देटाकडील भाग गोलाकार पद्धतीने सूरी हलकेच फिरवून वरवर हलका कापून घ्यावा. लक्षात ठेवा देटाकडील भाग संपूर्णपणे सुरीने कापू नये. त्यानंतर, देटाकडील सुरीने हलकेच कापून घेतलेल्या भागाला हाताने गोलाकार पद्धतीने फिरवून देटाकडील भाग वेगळा करून घ्यावा. मग किवी आडवी धरून बरोबर मधोमध सुरीने कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. स्टीलचा एक चमचा घेऊन सालं आणि किवीचा गर यांच्या बरोबर मधोमध भागात घालून चमच्याने गर काढून घ्यावा. अशाप्रकारे तुम्ही अगदी सहज पद्धतीने किवी सालीपासून वेगळी करून खाऊ शकता. 

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

फक्त ३ पदार्थांत करा १० मिनिटांत दहीकांडी, - बालपणीची आठवण सांगणारा गोड थंडगार पदार्थ...

२. दुसऱ्या पद्धतीत, किवी सपाट पृष्ठभागावर उभी ठेवून सुरीच्या मदतीने सी - सॉ टेक्निक पद्धतीने सूरी वर खाली फिरवत सालं काढून घ्यावे. या पद्धतीमध्ये, संपूर्ण किवीची सालं आपण एकाच वेळी संपूर्णपणे काढू शकतो. त्यानंतर सालं काढून घेतलेल्या किवीचे आपण लांब - लांब फोडी किंवा गोलाकार काप  करून देखील खाऊ शकतो. 

फक्त १० मिनिटांत करा आंब्याचा मऊ - लुसलुशीत शिरा, एकदा कराल टेस्ट तर म्हणाल बेस्ट...

अशाप्रकारे आपण या दोन ट्रिक्स वापरुन किवीची सालं अगदी मिनिटभरात सहज काढून किवी खाऊ शकता. किवीची सालं सोलून काढण्याचे कंटाळवाणे काम आता होईल चुटकीसरशी...

टॅग्स :अन्नकिचन टिप्सफळेकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.