Lokmat Sakhi >Food > १ खास ट्रिक वापरून करा भरली कारली; कारलं अजिबात कडू लागणार नाही- आवडीने खातील सगळेच

१ खास ट्रिक वापरून करा भरली कारली; कारलं अजिबात कडू लागणार नाही- आवडीने खातील सगळेच

How To Cook Stuff Bitter Gourd : कारल्याच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:47 IST2025-09-22T13:45:51+5:302025-09-22T16:47:49+5:30

How To Cook Stuff Bitter Gourd : कारल्याच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात.

How To Cook Stuff Bitter Gourd How To Make Bharwa Karela And Get Rid Of Bitterness From Bitter Gourd | १ खास ट्रिक वापरून करा भरली कारली; कारलं अजिबात कडू लागणार नाही- आवडीने खातील सगळेच

१ खास ट्रिक वापरून करा भरली कारली; कारलं अजिबात कडू लागणार नाही- आवडीने खातील सगळेच

कारलं कडू  (Bitter Gourd) लागतं म्हणून बरेचजण कारलं खाणं टाळतात. कारल्याची भाजी केली तर घरातील सगळेचजण खातात असं नाही काहीजण खातात तर काहीजण टाळतात. यात मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. कारल्याच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (How To Cook Stuff Bitter Gourd)

यात व्हिटामीन्सही असतात ज्यामुळे आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. कारल्याची भाजी तुम्ही खास पद्धतीनं बनवू शकता. भरलेलं कारलं तुम्ही काही सोप्या ट्रि्क्स आणि टिप्स वापरून केलं तर त्याची चव घरातील सर्वांनाच आवडेल कारण कारल्याचा कडवटपणा दूर होईल.(How To Get Rid Of Bitterness of Bitter Gourd)

युट्यूबर रिना  यांनी आपल्या चॅनेलवर भरलेलं कारलं करण्याची सोपी रेसिपी शेअर केली आहे. यामुळे फक्त  कारलं स्वादीष्ट लागणार नाही तर कारल्याच्या सालीतील पोषणही मिळेल ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि वारंवार ट्राय कराल अशी आहे. भरलेली कारली करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Cook Bitter Gourd)

सगळ्यात आधी  कारलं धुवून सालं काढून घ्या. कारल्याचं साल अजिबात फेकू नका.  याचाच  वापर करून  तुम्हाला भरलेल्या कारल्यांचे स्टफिंग तयार करायचे आहेत. कारल्याचा सगळ्यात जास्त कडवटपणा कारल्याच्या सालींमध्येच असतो.सालं काढून टाकल्यानंतर बिया  काढून फेकून द्या.  नंतर चिरलेल्या कारल्यांच्या आत बाहेर व्यवस्थित मीठ शिंपडून घ्या. नंतर सालींवरही मीठ शिंपडा. काहीवेळासाठी तसंच राहू द्या. त्यानंतर कांदा कापून घ्या आणि भरलेल्या कारली करण्यासाठी बाकीचे मसाले तयार ठेवा. १० मिनिटानंतर कारलं आणि सालं व्यवस्थित धुवून सुकवून घ्या.

एक कढई गरम करून घ्यात सुके मसाले जसं की जीरं, बडिशेप, लाल मिरची, धणे, ओवा घालून व्यवस्थित भाजून घ्या.  भरलेल्या कारल्यांचा मसाला तयार आहे. खडे मसाले भाजल्यानंतर ते दळून घ्या.  नंतर एका कढईत तेल गरम करून सालं भाजून घ्या. त्यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या आणि आल्याची पेस्ट घाला. लसणाचा रंग ब्राऊन झाल्यानंतर त्यात चिरलेली मिरची आणि  कांदासुद्धा घाला.

नंतर कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यात  हळद, लाल मिरची पावडर, मीठ, गरम मसाला आणि आमसूल पावडर  घाला. हाच मसाला तुम्हाला कारल्यांमध्ये स्टफिंगसाठी वापरायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून व्यवस्थित सर्व पदार्थ भाजून घ्या. एक वाटी साय  घालून पुन्हा एक मिनिट भाजून घ्या. शेवटी थोडी साखर घाला. साखर घालून सर्व पदार्थांची चव व्यवस्थित संतुलित होईल.

दुसऱ्या कढईत तेल गरम करून नंतर कारलं फ्राय करून घ्या.  यामुळे कारल्याचा कडवटपणा निघून जाईल. कारलं ब्राऊन झाल्यानंतर काढून घ्या. कारलं व्यवस्थित थंड करून  घ्या. नंतर  यात स्टफिंग घाला. स्टफिंग आणि कारलं आणि स्टफिंग वेगवेगळ्या पद्धतीनं भाजल्यामुळे त्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होईल आणि चवही वाढेल.

एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या त्यात भरलेलं कारलं घालून एक मिनिटं झाकून शिजवून घ्या. या पद्धतीनं लगेच भरलेली कारली तयार होतील. तुम्ही कारली एक आठवड्यापर्यंत स्टोअर करू शकता किंवा स्टफिंग एका प्लेटमध्ये पररवून त्यात भरलेली कारली ठेवून सर्व्ह करू शकता. 

Web Title: How To Cook Stuff Bitter Gourd How To Make Bharwa Karela And Get Rid Of Bitterness From Bitter Gourd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.