Join us

कांदा चिरताना डोळ्यातून पाण्याच्या धारा? कांदा चिरताना ३ प्रकारच्या पाण्यात ठेवा - कांदा रडवणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2024 14:17 IST

How to Chop Onions Without Tears-3 Tips : कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येत असेल तर, ३ टिप्सची मदत घेऊन पाहा..

काही जण प्रत्येक फोडणीत कांद्याचा (Onions) वापर करतात. जितका कांद्याचा वापर तितकी भाजी किंवा आमटी उत्कृष्ट होते, असे म्हटले जाते. कांद्याचा वापर फक्त फोडणीसाठी नसून, अनेक पदार्थ तयार करण्यासाठीही केला जातो. कांद्याची भाजी, चटणी, पराठा, भजी आपण खाल्लीच असेल. कांदा खायला जितका रुचकर लागतो तितकाच चिरताना रडवतो. पण कांदा रडवत नसून, एन्झाईम्समुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं (Kitchen Tips).

कांद्याच्या पेशींमध्ये असणार्‍या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक, चुरचुरणारे ठरतात. त्यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये, यासाठी काय करावे? पाहा ३ टिप्स, कांदा रडवणार नाही(How to Chop Onions Without Tears-3 Tips).

मिठाचे पाणी

मिठाचे पाणी भाज्यांमधील कडूपणा कमी करते. यासह याचा वापर आपण कांद्यातील तिखटपणा कमी करण्यासाठी करू शकता. यासाठी एका वाटीत पाणी घ्या, त्यात मीठ मिसळा. नंतर कांद्याची साल काढून त्याचे दोन भाग तयार करा. कांदा मिठाच्या पाण्यात ठेवा. काही वेळानंतर कांदा चिरून घ्या. यामुळे कांदा चिरताना डोळ्यांना चुरचुरणार नाही.

ना तेल - ना झंझट, टम्म फुगीर पुऱ्यांची सोपी रेसिपी; 100 % ऑईल-फ्री पुऱ्या खाऊन पाहाच..

आईस चिल्ड वॉटर

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये असे वाटत असेल तर, थंड पाण्याचा वापर करा. एका बाऊलमध्ये थंड पाणी घ्या, त्यात कांद्याच्या फोडी १५ मिनिटांसाठी ठेवा, नंतर कांदा चिरा. थंड पाण्यामुळे कांद्यामधील रसायने बाहेर पडण्यापासून रोखले जातात. ज्यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही.

लांबट जांभळ्या वांग्याचे करा खमंग कुरकुरीत काप फक्त ५ मिनिटांत, जेवताना तोंडाला येईल चव

लिंबू पाणी

लिंबाच्या पाण्यामुळे कांदा चिरताना डोळ्यांना त्रास होत नाही. कांद्याचे रसायन व्हिनेगर किंवा लिंबाच्या पाण्यात रिलीज होतात. ज्यामुळे कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा लिंबाचा रस, अर्धा कप पाणी आणि एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करा. या पाण्यात २० मिनिटांसाठी कांद्याच्या फोडी ठेवा. नंतर कांदा चिरा. यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स