उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी बरेच लोक नारळ पाणी पितात. नारळ पाणी हे कोणत्याही अमृतापेक्षा कमी नसते. नारळपाणी फक्त तहान भागवत नाही तर शरीराला त्वरीत एनर्जी देण्यासाठीही गुणकारी ठरते. लोक अनेकदा शहाळं विकत घेताना फसतात. शहाळं आतून सुकलेले असतात आणि इतके पैसे देऊन काहीच पाणी निघत नाही. (How To Choose Coconut With More Water)
नारळपाणी विकणाऱ्या दादांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकमुळे तुम्हालाही खूप पाणी असलेलं शहाळं शोधणं सोपं होईल. नारळपाण्याची क्वालिटी ओळखण्याची ही ट्रिक आवाजाशी जोडलेली आहे. कसं निवडावं ते समजून घ्या. (How To Identify Dry And Watery Coconut Before Buy It)
आकार
लोक हा विचार करून मोठं शहाळं उचलतात की यात जास्त पाणी असेल पण हा एक चुकीचा समज आहे. विक्रेते सांगतात की नेहमीच मध्यम आकाराच्या शहाळ्याची निवड करावी. मोठ्यामध्ये मलई जास्त असते आणि पाण्याचे प्रमाण कमी असते. मध्यम आकाराचे शहाळं कच्चे नसतात जास्त पिकलेलेही नसतात म्हणून यात पाण्याचं संतुलन चांगले राहते.
नारळाचा आवाज
शहाळं कानाजवळ घेऊन दोन्ही हातांनी हलवून पाहा. ही खूप जुनी ट्रिक आहे. खूप आवाज येत असेल तर यात पाणी नाही असं समजा. नारळाच्या आत हवा जास्त आणि पाणी कमी असते. जे शहाळं हलवल्यावर त्यातून आवाज येत नाही अशात पाणी भरपूर असते. जास्त आवाज येणारं शहाळं सुकलेलं किंवा खराबही असू शकतं.
त्रिकोण आकार तयार होत असलेले शहाळं बनावट असतात. रिकामे आणि सुकलेले असतात. पूर्णपणे अंडाकृती किंवा गोल असलेल्याची निवड करा.
वरून सुकलेलं..
बाहेरील साल थोडे सुकलेले दिसते ते पूर्णपणे पिकलेले असते. शहाळं विकत घेताना जर जास्त वजनदार वाटत असेल तर बिंधास्त घ्या. जड नारळाचा संबंध जास्त पाण्याशी असतो. पण जर शहाळं हलकं वाटत असेल तर त्यातील पाणी सुकलेलं असू शकतं.
Web Summary : Want more coconut water? Choose medium-sized, slightly dry coconuts. Heavier coconuts with less sound when shaken have more water. Avoid triangular ones for optimal hydration.
Web Summary : अधिक नारियल पानी चाहिए? मध्यम आकार के, थोड़े सूखे नारियल चुनें। हिलाने पर कम आवाज वाले भारी नारियल में अधिक पानी होता है। सर्वोत्तम जलयोजन के लिए त्रिकोणीय आकार के नारियल से बचें।