नारळ फोडणं हे खूपच कठीण काम वाटतं. आधी नारळाच्या शेंड्या सोलून नंतर ते फोडावं लागतं. नारळाची सालं काढून नंतर आतले गर काढायला खूप मेहनत लागते. अनेकदा नारळ काढताना हातालासुद्धा लागतं. नारळ फोडण्याची सोपी ट्रिक फॉलो केल्यास कमीत कमी मेहनतीत नारळ फुटून खोबरं हातात येण्यास मदत होईल. (Easy Way To Break Coconut)
नारळ फोडण्याचे सोपे उपाय
सगळ्यात आधी नारळाचे शेंडे काढून घ्या. नंतर नारळ थंड जागेवर ठेवा. नारळ काही वेळासाठी गरम पाण्यात ठेवा. नंतर नारळ बाहेर काढून सुरीच्या मदतीनं फोडण्याचा प्रयत्न करा.
पाण्याचा निचरा आणि चिन्हांचा वापर
नारळ फोडण्यापूर्वी त्यावरील शेंडी काढून टाका. नारळाला वरच्या बाजूला तीन डोळे असतात. त्यातील जो मऊ डोळा असतो, तिथे छिद्र करून पाणी काढून घ्या. यामुळे नारळ फोडताना पाणी सांडत नाही आणि दाबामुळे तो अस्ताव्यस्त फुटत नाही.
नारळ हातात धरून त्याच्या मध्यभागावर लक्ष केंद्रित करा. जड विळा किंवा हातोड्याने नारळाच्या बरोबर मध्यभागी गोलाकार फिरवत हलकेच प्रहार करा. २-३ वेळा ठोकल्यानंतर तिथे एक नैसर्गिक भेग पडते आणि नारळ बरोबर दोन समान भागात विभागला जातो.
नारळ फोडण्यापूर्वी साधारण १०-१५ मिनिटे फ्रिजरमध्ये ठेवा. गारव्यामुळे करवंटी थोडी आकुंचन पावते. त्यानंतर बाहेर काढून कडक वस्तूने मध्यभागी मारल्यास तो सहज फुटतो. नारळ फोडताना नेहमी खाली एखादे भांडे ठेवा जेणेकरून उरलेले पाणी वाया जाणार नाही.
हाताला इजा होऊ नये म्हणून नारळ सुती कापडाने पकडणे अधिक सुरक्षित ठरतं . जर नारळ फोडताना तो तिरपा फुटला, तर काळजी करू नका. नारळ ओला असतानाच त्याच्या कडांवर लिंबाचा रस लावला तर खोबरं लवकर खराब होत नाही आणि पांढरशुभ्र राहतं.
