गरमागरम कांदेपोहे हा बहुसंख्या महाराष्ट्रीयन लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. कित्येक घरांमध्ये तर आठवड्यातून एकदा तरी नाश्त्यासाठी पोहेच केले जातात. घरी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठीही झटपट पोहे केले जातात. एकंदरीतच काय की पोहे हा कित्येक लोकांचा आवडीचा पदार्थ आणि तो आपण नेहमीच करतो. पण त्यासोबतच काही जणांचं हे देखील दुखणं असतं की पोहे खाल्ल्यानंतर त्यांना ॲसिडीटी होते. तुम्हालाही हा त्रास होत असेल तर पोहे करताना फक्त २ गोष्टी लक्षात ठेवा. त्या पद्धतीने जर तुम्ही पोहे केले आणि ते खाल्ले तर तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास मुळीच होणार नाही.(how to avoid acidity after eating poha?)
पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडीटी होऊ नये म्हणून काय करावं?
१. पाेहे खाल्ल्यानंतर ॲसिडीटी होण्याचं एक कारण म्हणजेे आपण पोह्यांमध्ये ज्या पद्धतीने मिरच्या घालतो ती पद्धत. तिथे आपलं चुकतं आणि मग ॲसिडीटी होते. आता मिरच्यांशिवाय पोहे खमंग लागत नाहीत हे खरंय. म्हणूनच त्यात मिरच्या घाला पण त्या घालण्याची पद्धत थोडी बदला.
फोडणी झाल्यानंतर त्यात मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि ते तळून घ्यायचे अशी आपल्याकडे पद्धत आहे. असं केल्याने मिरच्यांचे ॲसिडीक गुणधर्म पोह्यांमध्ये जास्त प्रमाणात जातात आणि ॲसिडीटी वाढते. म्हणूनच अशा पद्धतीने पोह्यांमध्ये मिरच्या तळून घालू नका.
२. दुसरी गोष्ट म्हणजे पोहे करताना त्यात बटाटे, गाजर, मटार असे फायबरयुक्त पदार्थही जास्त प्रमाणात घाला. पोह्यांमधले फायबरयुक्त पदार्थ वाढले की आपोआपच त्यांच्यामुळे होणारी ॲसिडीटी कमी होते.
शिवाय हे पदार्थ घातल्याने पोह्यांची पौष्टिकताही जास्त वाढते. या दाेन गोष्टी लक्षात ठेवून जर पोहे केले आणि ते खाल्ले तर ॲसिडीटी होणार नाही, असं डॉक्टर सांगतात.
