सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रेशर कुकरमुळे सर्वांचीच कामं सोपी झाली आहेत. जवळपास प्रत्येक घरामध्ये प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरमध्ये भात नेहमीच बनवला जातो. पण भाताव्यतिरिक्त इतर पदार्थही केला जातात. प्रेशर कुकरमध्ये भाजी, डाळ, खिचडी असे वेगवेगळे पदार्थ शिजवले जात असले तरी प्रत्येक पदार्थ शिजवण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो. प्रेशर कुकरच्या किती शिट्ट्या कोणत्या पदार्थासाठी घ्यायच्या ते समजून घेऊ. (How many whistles should the cooker make while cooking rice, vegetables, and khichdi)
कुकरमध्ये कोणता पदार्थ शिजायला किती शिट्ट्या घ्याव्यात?
प्रेशर कुरकमध्ये कितीवेळ कोणताही पदार्थ शिजवायचा यासाठी धान्य भिजवण्याची वेळ, पाण्याचं प्रमाण, आच मंद आहे की उच्च या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. डाळ करताना २ ते ३ शिट्ट्या घ्याव्या लागतात, राजमा किंवा इतर शेंगा शिजवायला ४ ते ६ शिट्ट्या लागतात. जर भिजवलेल्या डाळी शिजवायच्या असतील तर तुम्ही शिट्ट्यांची संख्या कमी करू शकता. भिजवलेले छोले असतील तर ३ ते ४ शिट्ट्या पुरेशा आहेत किंवा ५ ते ६ शिट्ट्या घ्या.
प्रेशर कुकरचा टाईपआणि साईजसुद्धा लक्षात घ्यायला हवी. मोठ्या कुकरच्या शिट्ट्या व्हायला जास्त वेळ लागतो तर लहान कुकरमध्ये लवकर शिट्ट्या होतात. जर जुना कुकर असेल तर शिट्ट्या व्हायला जास्त वेळ लागू शकतो. २ ते ३ शिट्ट्यांमध्ये पदार्थ तयार होतो. ३ शिट्ट्या व्हायला जवळपास ७ ते ८ मिनिटं लागतात.
पहिली शिट्टी वाजल्यानंतर आच कमी ठेवा. प्रेशर कुकर लगेच उघडू नका. शिट्टी वाजण्याचा अर्थ असा नाही की अन्न शिजलं आहे. अन्न शिजण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्हाला शंका वाटत असेल तर शिट्टी घेतल्यानंतर आच मंदत करा नंतर अन्न शिजलं आहे की नाही ते पाहा.
चणे किंवा हरभरे शिजायला साधारण ५ ते ७ शिट्ट्या लागतात, राजमा शिजायला ७ ते ९ शिट्ट्या, पालेभाज्या शिजायला १ ते २ शिट्ट्या पुरेश्या असतात. बटाटा शिजायला ३ ते ४ शिट्ट्या लागतात. या शिट्ट्यांची सख्या एक साधारण अंदाज आहे. शिट्ट्यांची संख्या तुमच्या कुकरचा प्रकार, उष्णता, तुम्ही वापरत असलेले पाणी आणि तुम्हाला किती मऊ पदार्थ हवा आहे यावर अवलंबून असते.
