What is the correct time to eat amla: वाढतं वजन आणि आजारांचा वाढता धोका यामुळे आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत फार जागरूक झाले आहेत. नॅचरल गोष्टींचा आहारात समावेश वाढवला आहे. यातीलच एक म्हणजे आवळा. आवळ्याला आरोग्यासाठी सुपरफूड मानलं जातं. हेच कारण आहे की, अनेक हेल्थ एक्सपर्ट आवळे वेगवेगळ्या पद्धतीने आवळे खाण्याचा सल्ला देत असतात. पण आवळा खाताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं. डायटिशिअन रंजनी रमन यांनी इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, कोणत्या गोष्टींची काळजी घेऊन आवळे खाल्ले तर आपल्याला फायदे मिळू शकतील.
किती प्रमाणात खावे?
डायटिशिअन सांगतात की, अनेक फायदे मिळतात म्हणून बरेच लोक जास्त प्रमाणात आवळे खातात. पण जास्त आवळे खाऊन फायदे मिळत नाही. उलट नुकसान होऊ शकतं. रोज अर्धा किंवा एक ताजा आवळा खाणं पुरेसं असतं. जर आवळ्याची पावडर वापरत असाल तर अर्धा चमचा पुरेशी आहे. जास्त प्रमाणात खाल तर काही लोकांच्या पोटात जळजळ किंवा गॅसची समस्या होऊ शकते.
आवळा खाण्याची योग्य वेळ
आवळे खाण्यासाठी चांगली वेळ जेवणासोबत किंवा जेवण केल्यानंतरची मानली जाते. यातील पोषक तत्व या वेळेत अधिक अॅब्जॉर्ब होतात. तसेच बरेच लोक उपाशीपोटी आवळे खाणं चांगलं मानतात. पण असं केल्यास काही लोकांना अॅसिडिटी किंवा जुलाब लागण्याची भीती असते. त्यामुळे उपाशीपोटी आवळा खाणं टाळलं पाहिजे.
रोज खावेत का आवळे?
डायटिशिअन सांगतात की, आठवड्यातून ३ ते ४ वेळा आवळे खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं.
आवळे खाण्याची योग्य पद्धत
आपण आवळे वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो. आपण कच्चे ताजे आवळे थेट खाऊ शकतो. हलके शिजवून खाऊ शकतो किंवा चटणी खाऊ शकतो. पावडरचा वापर करू शकतो किंवा आवळ्याचा ज्यूस पिऊ शकतो. कच्चे आवळे नेहमी थोडं मीठ लावूनच खाल्ले पाहिजेत. आयुर्वेदात एकूण ६ रस आहेत. आवळ्यामध्ये खारट सोडून सगळे रस असतात. त्यामुळे मिठासोबत त्याचं सेवन करावं. मिठासोबत याचं सेवन करून तो संपूर्ण बनतो आणि त्याचा आंबटपणाही बॅलन्स होतो. तसेच आवळ्यात फायदेही अधिक वाढतात.
कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी?
ज्या लोकांना नेहमीच अॅसिडिटी किंवा पोटासंबंधी गंभीर समस्या असते किंवा जे लोक एखाद्या आजाराची औषधं नियमित घेत असतील त्यांनी आवळे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोणते आवळे खावेत?
अनेकांना प्रश्न पडतो की, कोणत्या प्रकारचे आवळे खाण्यासाठी अधिक चांगले असतात. बाजारात दोन प्रकारचे आवळे मिळतात एक म्हणजे छोट्या आकाराचे आणि दुसरे मोठ्या आकाराचे. एक्सपर्टनुसार, गावराणी आवळे खावेत जे आकाराने लहान असतात. मोठ्या आकाराचे आणि स्वच्छ दिसणारे आवळे हायब्रिड असतात. ते खाऊ नये
Web Summary : To maximize amla's health benefits, limit intake to one fresh amla daily or ½ tsp powder. Eat with meals, avoiding empty stomach consumption to prevent acidity. Amla can be eaten 3-4 times weekly. Add salt to balance flavors. Those with acidity or medication users should consult doctors.
Web Summary : आंवला के स्वास्थ्य लाभों को अधिकतम करने के लिए, दैनिक सेवन को एक ताजे आंवले या ½ चम्मच पाउडर तक सीमित करें। एसिडिटी को रोकने के लिए खाली पेट खाने से परहेज करते हुए भोजन के साथ खाएं। आंवला हफ्ते में 3-4 बार खाया जा सकता है। स्वाद को संतुलित करने के लिए नमक मिलाएं। एसिडिटी या दवा उपयोगकर्ताओं को डॉक्टरों से परामर्श करना चाहिए।