Water Drinking Tips : बॉटलमधील विकतचं पाणी घेऊन पिणं हल्ली फारच कॉमन झालं आहे. भरपूर लोक प्रवासादरम्यान किंवा बाहेर जेवण करायला गेल्यावर बॉटलमधील पाणी पितात. पण अनेकदा बॉटलमधील पाण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहतात. वेगवेगळे रिपोर्ट्सही समोर येत असतात. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अनेक आठवडे बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी पिणं सुरक्षित मानलं जात नाही. पाणी खराब होत नाही, पण ज्या बॉटलमध्ये ते स्टोर केलं जातं ती समस्येचं कारण बनू शकते. जेव्हा बॉटल प्लास्टिकची असेल आणि जास्त दिवस न धुताच वापरली जात असेल.
पाण्यात वाढतात बॅक्टेरिया
बऱ्याच लोकांना हेच वाटतं की, पाणी कधी खराब होत नाही. पण मुळात सत्य हे आहे की, जेव्हा आपण एकाच बॉटलने पुन्हा पुन्हा पाणी पितो, तेव्हा आपली लाळ आणि तोंडातील कीटाणू पाण्यात मिक्स होतात. नंतर हेच कीटाणू बॉटलमध्ये वाढू लागतात. जर बॉटल योग्यपणे स्वच्छ केली नाही तर त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात.
प्लास्टिकच्या बॉटलने जास्त धोका
रिपोर्टनुसार, बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी काही दिवसांनंतर पूर्णपणे सुरक्षित राहत नाही. जर पाणी बॉटलमध्ये अनेक आठवडे ठेवलं असेल, त्यात बॅक्टेरियाची संख्या वाढू शकते. प्लास्टिकच्या बॉटलमध्ये धोका आणखी जास्त होऊ शकतो, कारण गरमी किंवा उन्हात ठेवल्याने प्लास्टिकचे रसायन पाण्यात मिक्स होऊ शकतात. त्यामुळे जास्त दिवसांपासून ठेवलेलं प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पिणं योग्य मानलं जात नाही.
एक्सपर्ट सांगतात की, बॉटलचं झाकण एकदा उघडल्यानंतर जास्त दिवसांपर्यंत ते ठेवू नये. जर पाणी एक आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त जुनं असेल तर पिणं टाळलं पाहिजे. १३ आठवडे जुनं पाणी अजिबात पिण्यासाठी सुरक्षित नसतं.
खराब पाण्याचा आरोग्यावर काय होतो प्रभाव?
बॉटलमध्ये बऱ्याच दिवसांपासून ठेवलेलं पाणी प्यायल्यास पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. जसे की, पोटदुखी, उलटी, जुलाब किंवा हलकं इन्फेक्शन. काही लोकांमध्ये घशात जळजळ किंवा अॅसिडिटी होऊ शकते. खासकरून लहान मुले, वृद्ध आणि कमजोर इम्युनिटी असलेल्या लोकांनी अधिक सावध रहायला हवं.
पाणी सुरक्षित ठेवण्याची योग्य पद्धत
पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बॉटल रोज क्लीनिंग लिक्विडने आणि कोमट पाण्याने स्वच्छ केली पाहिजे. पाणी झाकूण आणि थंड ठिकाणी ठेवा. फार जास्त जुनी किंवा स्क्रॅचेस पडलेल्या प्लास्टिक बॉटलचा वापर करू नये. प्रयत्न करा की, स्टील किंवा काचेच्या बॉटलचा वापर करावा. कारण यात रसायने मिक्स होण्याचा धोका कमी असतो.
किती जुनं पाणी सुरक्षित?
मुळात मुद्दा हा आहे की, पाणी सुरक्षित दिसत असलं तरी पूर्णपणे सुरक्षित असेल हे गरजेचं नाही. जर पाणी अनेक आठवड्यांपासून बॉटलमध्ये ठेवलं असेल तर ते पिण्याऐवजी फेकावं. ताजं आणि साफ पाणी आरोग्यासाठी सुरक्षित मानलं जातं.
