उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि या दिवसांत लोक थंड पाणी पिणं पसंत करतात. पण जर माठातलं पाणी थंड होत नसेल तर तुम्ही काही ट्रिक्स वापरून माठातलं पाणी थंडगार करू शकता. या उपायांनी जवळपास ४ महिने रोज माठात भरलेलं पाणी थंडगार राहील. (5 Tips To Keep Pot Water Chilled)
उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रीजमधील बर्फासारख्या थंड पाण्यापेक्षा माठातील नैसर्गिकरीत्या थंड झालेले पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. माठातील पाणी केवळ तहान भागवत नाही, तर ते शरीरातील उष्णता कमी करण्यासही मदत करते. माठातील पाणी अधिक थंड करण्यासाठी काही खास आणि प्रभावी टिप्स खालीलप्रमाणे आहेत. (How keep Pot Water Chill)
नवीन माठ घेतानाची काळजी
पाणी थंड होण्यासाठी माठ 'सच्छिद्र' (Porous) असणे अत्यंत आवश्यक आहे. माठ घेताना तो चांगला आहे की नाही हे तपासून घ्या. नवीन माठ घरी आणल्यावर तो किमान २४ तास साध्या पाण्यात भिजवून ठेवावा, ज्यामुळे त्याचे सूक्ष्म छिद्र मोकळे होतात.
शरीरात प्रोटीनची कमतरता सांगणारी ८ लक्षणं; मसल्स कमकुवत होण्याआधी प्रोटीन फूड खा
माठाची जागा महत्त्वाची
माठ कधीही बंद कपाटात किंवा कोपऱ्यात ठेवू नका. जिथे हवा खेळती असेल (Cross-ventilation), अशा जागी माठ ठेवावा. खिडकीजवळ किंवा जिथे वारा लागतो अशा ठिकाणी माठ ठेवल्यास 'बाष्पीभवनाचा' वेग वाढतो आणि पाणी लवकर थंड होते.
ओल्या सुती कापडाचा वापर
ही सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत आहे. माठाच्या भोवती एक जाड सुती कापड किंवा जुने पंचा गुंडाळा आणि ते कापड सतत ओले ठेवा. कापडातील पाण्याचे बाष्पीभवन होताना ते माठातील उष्णता शोषून घेते, ज्यामुळे पाणी कमालीचे थंड होते.
रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? तेल विकत घेताना ३ गोष्टी लक्षात ठेवा
वाळूचा आधार (रेतीचा थर)
एका मोठ्या पसरट परातीत किंवा कुंडीच्या डिशमध्ये जाड वाळूचा थर लावा. ही वाळू पाण्याने पूर्णपणे ओली करा आणि त्यावर माठ ठेवा. वाळूतील ओलावा माठाचा तळ थंड ठेवतो, ज्यामुळे खालून वरपर्यंत पाणी गार राहते.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको
दर आठवड्याला माठ रिकामा करून हाताने घासून स्वच्छ करा. माठाच्या बाहेरील छिद्रांमध्ये धूळ साचली की बाष्पीभवन थांबते. त्यामुळे बाहेरूनही माठ स्वच्छ धुणे गरजेचे आहे. मात्र, माठ धुताना कधीही साबण किंवा डिटर्जंट वापरू नका, यामुळे माठाची छिद्रं कायमची बंद होऊ शकतात.
माठ झाकून ठेवा
नेहमी माठावर मातीचेच झाकण ठेवा आणि त्यावर थोडे पाणी शिंपडा. पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचा तांब्या वापरावा, जेणेकरून हातातील उष्णता किंवा अस्वच्छता पाण्यात जाणार नाही. या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्हाला फ्रीजच्या मदतीशिवाय माठात अगदी 'चिल्ड' पाणी मिळू शकेल, जे तुमच्या घशासाठी आणि पचनासाठी अत्यंत उत्तम ठरेल.
Web Summary : Keep your pot water chilled this summer with these simple tricks. Choose porous pots, place them in ventilated areas, use wet cloths, and clean regularly. These methods help maintain cool water naturally.
Web Summary : इन आसान उपायों से मटके के पानी को गर्मियों में ठंडा रखें। छिद्रयुक्त मटके चुनें, हवादार जगह पर रखें, गीले कपड़े का उपयोग करें और नियमित रूप से साफ करें। ये तरीके प्राकृतिक रूप से पानी को ठंडा रखने में मदद करते हैं।