मऊसूत, पांढऱ्याशुभ्र टम्म फुगलेल्या इडल्या खाणं म्हणजे सुख... घरांतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत इडली हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ... बरेचदा काही घरांमध्ये रेशनच्या मिळणाऱ्या जाड्या - भरड्या तांदुळाच्या इडल्या केल्या जातात. परंतु रेशनवर मिळणाऱ्या तांदुळाच्या इडल्या केल्या की, अनेक गृहिणींची तक्रार असते की, इडल्या व्यवस्थित फुलून येत नाही किंवा कडक, वातड होतात आणि इडलीचा रंग देखील पिवळसर दिसतो. यामुळे रेशनींगच्या (perfect idli making from ration rice) मिळणाऱ्या जाड्या - भरड्या तांदळाच्या पांढऱ्याशुभ्र, मऊसूत इडल्या कशा होणार असा प्रश्न पडतो. पारंतू योग्य पद्धत आणि काही साध्या ट्रिक्स वापरल्या तर याच स्वस्त रेशनच्या तांदळापासून अतिशय पांढऱ्याशुभ्र आणि मऊसूत इडल्या तयार करता येऊ शकतात. तांदूळ भिजवण्यापासून पीठ आंबवण्यापर्यंत एक विशिष्ट पद्धत फॉलो केली, तर रेशनच्या तांदळाच्या इडल्या इतक्या छान होतात की कुणी ओळखूही शकणार नाही(hotel style idli from ration rice).
रेशनच्या तांदळापासून उडप्याकडे विकत मिळतात तशा मऊ, हलक्या आणि छान फुगलेल्या इडल्या अगदी सहज करता येतात. महागडा इडली रवा किंवा खास तांदूळ न वापरता, घरात उपलब्ध असलेल्या रेशनिंगच्या तांदळाच्या इडल्या परफेक्ट जमू शकतात. रेशनच्या जाड्या-भरड्या तांदळाच्या मऊसूत-लुसलुशीत इडल्या (how to ferment idli batter ration rice) करण्याची खास ट्रिक कोणती ते पाहूयात...
रेशनच्या तांदळापासून पांढरीशुभ्र जाळीदार इडली करण्याची ट्रिक...
१. रेशनचा तांदूळ - २ कप
२. पांढरी उडीद डाळ - १ कप
३. पोहे (पातळ/जाड कोणतेही) - १/२ कप
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. पाणी - गरजेनुसार
इडलीचे बॅटर तयार करण्याचे खास सिक्रेट...
१. तांदूळ आणि डाळ भिजवणे :- रेशनचा तांदूळ २ ते ३ वेळा धुवून ६ ते ८ तास पाण्यांत भिजवा. उडीद डाळसोबतच मेथी देखील वेगळ्या बाऊलमध्ये ६ ते ८ तास भिजत ठेवा, पोहे देखील ५ मिनिटे भिजवा.
२. उडीद डाळ मिक्सरमध्ये वाटणे :- सर्वातआधी उडीद डाळ थोडं - थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक फिरवा. पीठ फेसाळ झाले पाहिजे.उडीद डाळ नीट फेसाळ झाली की इडल्या जाळीदार होतात.
३. तांदूळ आणि पोहे वाटणे :- त्यानंतर तांदूळ आणि पोहे एकत्र वाटा. पीठ थोडंसं रव्याइतकं जाडसर असू द्या (खूप बारीक नाही).
४. दोन्ही पीठ एकत्र करणे :- दोन्ही पीठ एकत्र करून हाताने नीट मिसळा. १ ते २ मिनिटे हाताने मिक्स केल्यामुळे फर्मेंटेशन व्यवस्थित होते.
५. पीठ आंबवणे :- भांडं झाकून ८ ते १२ तास ठेवा. सकाळी पीठ फुगलेलं आणि हलकं फेसाळ दिसेल. पीठ आंबलेलं असेल तर हलकासर आंबट वास येतो आणि वर बुडबुडे दिसतात.
६. मीठ शेवटीच घाला :- पीठ आंबल्यावरच मीठ घाला, हलक्या हाताने ढवळा. जर पीठ खूप घट्ट असेल तर २ ते ३ चमचे पाणी घाला.
७. इडली स्टँड तयार करा :- इडली प्लेटला तेल लावा आणि पीठ ओता.
८. वाफवणे :- इडली कुकर किंवा इडली भांड्यात १० ते १२ मिनिटे वाफवा.खूप जास्त वाफवली तर इडली कडक होते. इडली शिजली का हे पाहायला सुरी/टूथपिक घालून बघा – स्वच्छ बाहेर आली तर इडली खाण्यासाठी तयार आहे.
इडलीचे पीठ आंबवण्याची खास ट्रिक...
पीठ आंबवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेच इडली फसते. पीठ आंबायला हवं, पण थंडी/हवामानामुळे किंवा पद्धत चुकीची असल्याने पीठ फुगत नाही. पीठ भांड्यात ओतल्यानंतर वरून थोडं कोमट पाणी/गरम पाणी (२ ते ३ चमचे) टाका. वरून झाकण ठेवून भांडं एका गरम ठिकाणी ठेवा. जर थंडी असेल तर पीठ कूकरमध्ये (गॅस बंद) किंवा ओव्हनमध्ये लाईट ऑन करून ठेवा. तसेच गरम पाण्याच्या भांड्याजवळ ठेवले तरी पीठ छान फुगतं. ही पद्धत वापरली की पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं आणि इडली एकदम मऊ, लुसलुशीत, पांढरीशुभ्र होते.
घड्याळ लावून फक्त १० मिनिटांत करा पोह्यांचा ढोकळा, कापसारखा पांढराशुभ्र आणि मऊ-पाहा रेसिपी...
परफेक्ट इडलीसाठी खास टिप्स...
१. उडीद डाळ चांगल्या उत्तम दर्जाची घेतली तर इडली टम्म फुगते.
२. पीठ मिक्सरमध्ये वाटून फेसाळ करा – जाळीसाठी हेच खरे सीक्रेट.
३. पीठ जास्त ढवळू नका – फुगवटाच कमी होतो.
४. इडली १० ते १२ मिनिटांपेक्षा जास्त वाफवू नका.
५. कोमट, गरम, ऊबदार जागेत किंवा पाण्याजवळ पीठ ठेवलं तर ते व्यवस्थित आंबतं.
