Join us
Daily Top 2Weekly Top 5

लहानपणी शाळेच्या गेटवर मिळणारी चिंचेची कॅण्डी आठवते, आंबटगोड चवीचं सुख! पाहा कॅण्डी घरी कशी करायची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 13:04 IST

homemade imli candy recipe : How To Make Imli Candy At Home : Chinchechi Candy Recipe : लहानपणी खाल्ली तशाच चवीची आंबट - गोड चिंचेची कँडी घरी करण्यासाठी पाहा स्पेशल रेसिपी...

चिंचेचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही...लहानपणी शाळेबाहेर मिळणारी आंबट-गोड चिंचेची कँडी आठवली की आजही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चिंचेची खास चव, त्यातलं गोड-तिखट मिश्रण आणि चघळताना मिळणारी आंबट - गोड चव यामुळे ही कँडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पण आजकाल बाजारात मिळणाऱ्या कँडीमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि जास्त साखरेचं प्रमाण असल्यामुळे अनेकजण घरच्याघरीच ही चिंचेची कँडी तयार करणं अधिक पसंत करतात. विशेष म्हणजे, घरच्या घरी अगदी कमी साहित्य वापरून स्वादिष्ट आणि हेल्दी चिंचेची कँडी सहज तयार करता येते(homemade imli candy recipe).

चिंच, गूळ आणि काही मसाल्यांच्या मदतीने बनणारी ही कँडी चवीला भन्नाट लागतेच, शिवाय पचनासाठीही फायदेशीर ठरू शकते. आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर काहीतरी चटपटीत खाण्याची सवय असते. बाजारातील गोळ्यांऐवजी जर आपण घरातल्याघरातच चिंचेची चविष्ट कँडी तयार केली तर ती चवीसोबतच, पचनशक्ती (How To Make Imli Candy At Home) सुधारण्यासही मदत करते. आरोग्याला फायदेशीर ठरणारी 'होममेड चिंच कँडी' कशी (Chinchechi Candy Recipe) तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. चिंच - २५० ग्रॅम 
२. पाणी - ३ कप 
३. मीठ - चवीनुसार
४. काळं मीठ - चवीनुसार 
५. लाल तिखट मिरची पावडर - १ टेबलस्पून
६. जिरेपूड - १ टेबलस्पून
७. लाकडी चमचा / स्टिक - गरजेनुसार
७. गूळ - ३ ते ४ टेबलस्पून 
८. तेल - १ टेबलस्पून 

घरच्याघरीच चिंचेची कँडी कशी करायची याची सोपी रेसिपी इंस्टाग्रामवरील foodiefemmepooja या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.   

भाजीपाल्यापासून दुधापर्यंत फ्रिजशिवाय सर्व काही राहील ताजं! उन्हाळ्यात अन्न खराब न होण्यासाठी ८ स्मार्ट ट्रिक्स... 


बाजारातील महागडे वेफर्स विसराल! घरीच करा कुरकुरीत 'कोथिंबीर पापडी' - मुलांनाही आवडेल चटपटीत पदार्थ...

कृती :- 

१. सगळ्यात आधी चिंच फोडून त्यावरील आवरण काढून त्या व्यवस्थित निवडून घ्याव्यात. 
२. एका पॅनमध्ये पाणी घेऊन त्यात आवरण काढून घेतलेली चिंच घालावीत. चमच्याने हळूहळू कालवून चिंच पाण्याच्या वाफेवर व्यवस्थित शिजू द्यावीत. 
३. पाण्यात शिजवून घेतलेली चिंच एका बारीक जाळीदार गाळणीत काढून चमच्याने हलकेच दाब देत त्याचा पल्प काढून घ्यावा. 
४. पॅन गरम करून त्यात तयार चिंचेचा रस घालावा मग त्यात गुळाचे तुकडे किंवा पावडर घालून ती संपूर्णपणे वितळवून घ्यावी. 

५. मग या मिश्रणात चवीनुसार मीठ, काळं मीठ घालावं. मिश्रण चमच्याने हलवत थोडं मध्यम घट्टसर होईपर्यंत नीट शिजवून घ्यावं. 
६. एका स्टीलच्या डिशला थोडंसं तेल लावून ते व्यवस्थित पसरवून याच डिशमध्ये चिंचेचे तयार मिश्रण गरम असतानाच ओतून घ्यावं. 
७. लाकडाच्या स्टिकला किंवा चमच्याला हे तयार मिश्रण थोडं थोडं लावून चिंचेच्या आंबट - गोड कँडी तयार करून घ्याव्यात. 

चिंचेच्या कँडी खाण्यासाठी तयार आहेत. या चिंचेच्या कँडी खाताना आपण वरून चवीनुसार जिरेपूड आणि लाल तिखट मसाला भुरभुरवून घालू शकता.

 चिंचेची कँडी कशी करायची याची सोपी रेसिपी युट्युबवरील @burrpet_dhruvijain या चॅनेलवरुन शेअर करण्यात आली आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीउन्हाळासमर स्पेशल