Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना साय फेटण्याची झंझट, ना लोणी कढवण्याचे टेंन्शन! फक्त एका ट्रिकने होईल घट्ट - रवाळ साजूक तूप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2025 13:40 IST

homemade ghee from malai : quick ghee making trick : how to make desi ghee at home : time saving kitchen hacks for ghee making : सायीपासून कमी वेळात विकतपेक्षाही चविष्ट आणि घट्ट, दाटसर रवाळ तूप करण्याची भन्नाट ट्रिक...

बाजारांत साजूक तूप अगदी सहज विकत मिळते परंतु, कित्येक भारतीय घरांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने साजूक तूप तयार केले जाते. विकतचे साजूक तूप आणण्यापेक्षा घरच्याघरीच तयार केलेल्या तुपाची चव, रंग अप्रतिम असतो. पारंपरिक पद्धतीने घरच्याघरीच घट्ट, दाटसर व रवाळ साजूक तूप करायचे म्हटलं की फार मेहेनत घ्यावी लागते. साधारणपणे घरीच पारंपरिक पद्धतीने साजूक तूप करताना आपल्याला दुधावरची साय आधी साठवून ठेवावी लागते. मग साठवलेली साय व्यवस्थित फेटून घ्यावी लागते. इतकेच नाही तर लोणी निघण्यासाठी तासंतास रवीने घुसळावे लागते. मग तूप कढवण्यात देखील बराच वेळ जातो, अशी ही साजूक तूप तयार करण्याची पारंपरिक पद्धत वाटते तितकी साधीसोपी नसते. इतकी मेहेनत करूनही काहीवेळा साजूक तूप तयार करताना काही ना काही घोळ होतोच आणि ते बिघडते अशावेळी मेहेनत वाया जाते(time saving kitchen hacks for ghee making).

घरच्याघरीच साजूक तूप तयार करताना होणारी दमछाक पाहून अनेक गृहिणी ते घरीच तयार करण्यासाठी टाळाटाळ करतात. युट्यूबर पूनम देवनानी यांनी एक कमालची आणि सर्वात सोपी ट्रिक सांगितली आहे, ज्यात आपल्याला फक्त एक रात्र आधी एक छोटेसे काम करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० दिवसांच्या साठवून ठेवलेल्या सायीपासून घट्ट, दाटसर, शुद्ध तूप फक्त काही मिनिटांत तयार होईल. रोज जमा होणाऱ्या सायीपासून कमी वेळात विकत पेक्षाही चविष्ट आणि घट्ट, दाटसर रवाळ तूप करण्याची (quick ghee making trick) भन्नाट ट्रिक पाहूयात. 

कमी वेळात झटपट साजूक तूप घरीच तयार करण्याची भन्नाट ट्रिक... 

१. साजूक तूप तयार करायच्या आदल्या रात्री करा १ काम :-  साजूक तूप तयार करायच्या आदल्या रात्री आपल्याला एक खास काम करायचे आहे. सर्वातआधी १० दिवसांची जमा केलेली साय एका मोठ्या आणि पृष्ठभाग पसरट असणाऱ्या कढईत काढून घ्या. फ्रिजमध्ये ठेवलेली थंडगार साय थोडी नॉर्मल होऊ द्यावी. साय नॉर्मल झाल्यावर ही कढई गॅसच्या मध्यम आचेवर ठेवून मलई पूर्णपणे वितळेपर्यंत व्यवस्थित गरम करा. साय पूर्णपणे वितळताच गॅस लगेच बंद करा. आता कढई गॅसवरून खाली उतरवा आणि हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.

परभणीची कच्च्या फोडणीची चमचमीत खिचडी करण्याची भन्नाट रेसिपी, गरमागरम खिचडी त्यावर तूप.. चव जबरदस्त... 

२. मग करा एक भन्नाट उपाय :- ग्लासभर बर्फाची साधीसोपी ट्रिक तुमची तासंतासची मेहेनत वाचवेल आणि इन्स्टंट पद्धतीने साजूक तूप तयार करण्यासाठी मदत होईल. मलई वितळवण्यापूर्वीच एका ग्लासमध्ये पाणी भरून ते फ्रीजरमध्ये ठेवा, जेणेकरून त्यात बर्फ तयार होईल. जेव्हा वितळलेली साय थोडी नॉर्मल होऊन थंड होईल, तेव्हा तुम्हाला दिसेल की तुपाचा भाग हलका होऊन पृष्ठभागावर वर तरंगू लागलेला असेल. आता बर्फाने भरलेला तो ग्लास भांड्यात एका  बाजूला ठेवून द्या. हे भांडे ४ ते ५ तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये राहू द्या.   

३. तूप ताकापासून वेगळे करण्याची ट्रिक :- ठरलेल्या वेळेनंतर जेव्हा तुम्ही फ्रीजमधून भांडे बाहेर काढाल, तेव्हा तुम्हाला दिसेल की बर्फाने भरलेल्या ग्लासाच्या थंडपणामुळे तुपाचा भाग वरच्या बाजूला पूर्णपणे गोठलेला असेल, परंतु ताक मात्र द्रव स्वरूपात तसेच राहील. आता जेव्हा तुम्ही ग्लास बाहेर काढाल, तेव्हा त्याच्या जागी एक छिद्र तयार होईल. याच छिद्रामध्ये तुम्हाला पाणी टाकायचे आहे, ज्यामुळे तुपाचा गोठलेला भाग ताकापासून सहजपणे वेगळा  होईल.

फक्त १० मिनिटांत टोमॅटो बेसन पराठा करण्याची इन्स्टंट रेसिपी, मुलांच्याच काय मोठ्यांच्याही डब्यासाठी खास पदा‌र्थ...

४. लोणी पाण्याने स्वच्छ धुवून घेणे :- आता छिद्र असलेल्या भागात थंड पाणी टाका आणि ताक वेगळे करून काढून घ्या. तुम्हाला हवे असल्यास, आणखी थंड पाणी टाकून लोण्याला स्वच्छ धुवून घेऊ शकता, ज्यामुळे शिल्लक राहिलेले ताक आणि दूध यांचा भाग पूर्णपणे बाहेर निघून जाईल. लोण्याच्या  या गोळ्याला तुम्ही एकदा थंड पाण्याने धुवू शकता. अशा प्रकारे, तुपाचा भाग ताकापासून जवळजवळ पूर्णपणे वेगळा झाल्यावर, तुम्ही तो कढईत गॅसवर ठेवाल, तेव्हा ते २ मिनिटांत लोणी वितळायला लागेल.

या ट्रिकची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तूप काढण्यासोबतच आपल्याला ताक आणि साजूक तुपाची बेरी देखील मिळते. तुपाला उकळी येताच २ ते ३ मिनिटांत शुद्ध तूप तयार होते. तूप गाळून  वेगळे केल्यावर जो उर्वरित भाग शिल्लक राहतो, तो मावा असतो, ज्याचा उपयोग मिठाई बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, सायीपासून वेगळे झालेले ताक हे देखील आपण पिऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Ghee Recipe: No Churning, Just One Simple Trick!

Web Summary : Forget laborious ghee making! This simple trick using ice yields thick, granular ghee from stored cream overnight. A YouTuber's method saves time and effort, providing pure ghee, buttermilk, and mawa.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स