फ्रेंच फ्राईज म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ. करायला अगदीच सोपा आणि चवीला मस्त. फक्त मीठ, बटाटा, तेल बास एवढेच पदार्थ असले की झटपट फ्राईज करता येतात. पण मग विकतचे फ्राईज वेगळे लागतात आणि घरी तसे होत नाहीत. कारण काही स्टेप्स असतात ज्या आपण घरी करत नाही. पाहा काय केल्यावर अगदी विकत मिळतात तसेच फ्राईज घरी करता येतील. घरी केलेले फ्रेंच फ्राईजही अगदी हॉटेल-स्टाईल, बाहेरुन खुसखुशीत आणि आतून मऊ लागावेत असे वाटत असेल, तर फक्त तळण्यापेक्षा काही सोप्या गोष्टी खूप लक्षात ठेवा. बटाटा सोलण्यापासून ते शेवटच्या तळणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर थोडी काळजी घेतली, तर फ्रेंच फ्राईज अगदी विकतसारखेच लागतात.
सुरुवात बटाटा निवडण्यापासून करा. बटाटे सोलताना सोल जाड काढू नका; फक्त वरची साल नीट निघेल एवढीच काढा. सोलल्यानंतर लगेच बटाटे पाण्यात टाका, नाही तर ते काळपट पडतात. मीठ पाण्यात बटाटे १५ ते २० मिनिटे ठेवा. आता बटाट्याचे तुकडे करण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. फ्रेंच फ्राईज साधारण एकसारख्या जाडीचे कापा. फार पातळ कापले तर पटकन जळतात आणि फार जाड असतील तर आतून शिजायला वेळ लागतो. सगळे तुकडे जवळजवळ सारखे असतील, तर तळताना सगळे एकसारखे शिजतात.
बटाटा सोलून झाल्यावर किमान अर्धा तास थंड पाण्यात ठेवा. यामुळे त्यातील जास्तीचा स्टार्च निघून जातो आणि फ्राईज खुसखुशीत होतात. पाणी एक-दोन वेळा बदला आणि शेवटी बटाटे हाताने चोळून स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर हे खूप महत्त्वाचे आहे की बटाटे पूर्ण कोरडे करा. स्वच्छ कापडावर पसरवून ठेवा किंवा टिश्यूने नीट पुसा. ओलसर बटाटे तळले तर तेल उडते आणि फ्राईज कुरकुरीत होत नाहीत. चामट होतात. खुसखुशीतपणाचा सगळ्यात मोठा राज म्हणजे दोनदा तळणे. पहिल्यांदा मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल फार धूर निघेल इतके गरम नको. या तेलात बटाटे थोडे-थोडे घालून तळा. ते फक्त अर्धवट शिजतील आणि रंग बदलणार नाही इतकेच तळायचे. हे बटाटे काढून चाळणीवर किंवा टिश्यूवर ठेवा आणि पूर्ण थंड होऊ द्या.
दुसऱ्या तळणीवेळी तेल चांगले गरम असावे. आता अर्धवट तळलेले बटाटे पुन्हा तेलात सोडा. या वेळी ते लगेच फुलतात, बाहेरून सोनेरी होतात आणि आतून मऊ राहतात. रंग छान सोनेरी झाला की लगेच काढा. जास्त वेळ ठेवल्यास फ्राईज कडक होतात. जर अगदी फास्ट-फूडसारखी चव हवी असेल, तर तळण्याआधी कोरड्या बटाट्याला अगदी थोडे कॉर्नफ्लाअर किंवा तांदळाचे पीठ लावायचे. फार नाही, फक्त पातळ थर. यामुळे फ्राईज अजूनच खुसखुशीत होतात. या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर घरी बनवलेले फ्रेंच फ्राईज दिसायलाही छान आणि खायला अगदी विकत सारखेच लागतात. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि गरमागरम फ्राईज खाण्याची मजा वेगळीच असते.
Web Summary : Achieve restaurant-quality French fries at home by selecting the right potatoes, soaking them, and double-frying. Proper cutting, drying, and a touch of cornflour ensure crispy, golden, and delicious results every time.
Web Summary : सही आलू चुनें, उन्हें भिगोएँ और दो बार तलें। उचित कटिंग, सुखाना और थोड़ा सा कॉर्नफ्लोर हर बार क्रिस्पी, सुनहरा और स्वादिष्ट परिणाम सुनिश्चित करते हैं। घर पर रेस्टोरेंट जैसे फ्रेंच फ्राइज बनाएं।