Join us

homemade cake recipe : साजूक तुपातला केक, महागड्या केकपेक्षा भारी केक घरीच करण्याची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 10:28 IST

homemade cake recipe: Simple ghee cake, an easy recipe, homemade is always better, milk-ghee cake : घरी करा मस्त मऊ असा केक. करायला सोपा आणि पौष्टिकही.

घरी केलेला केक जास्त छान लागतो. विकत घ्यायचा म्हटलं की केक महाग पडतो. त्यामुळे घरा मस्त ताजा करुन खायचा. (homemade cake recipe: Simple ghee cake, an easy recipe, homemade is always better, milk-ghee cake)विकतचा केक आरोग्यासाठी चांगला नसतो. त्यामुळे घरीच करुन खा. घरच्या साजूक तुपातला केक अगदी मऊ आणि छान होतो. नक्की करुन पाहा. 

जर तुम्हाला केक पौष्टिक करायचा आहे तर साखरे ऐवजी खजूर पूड घालायची. तसेच बदाम काजू पूड आणि खडीसाखर वापरु शकता. थोडे मध घालायचे. म्हणजे केक गोडही लागतो आणि पौष्टिकही होतो. 

साहित्य तूप, पिठीसाखर, व्हॉनिला इसेंस, दूध पावडर, दूध, मैदा, बेकींग सोडा, बेकींग पावडर 

प्रमाणएक वाटी तूपएक वाटी पिठीसाखरदिड वाटी दूधदिड वाटी मिल्क पावडरअर्धा चमचा बेकींग पावडरअर्धा चमचा बेकींग सोडा 

कृती१. एका खोलगट पातेल्यात एक वाटी वितळलेलं तूप घ्यायचं. त्यात एक वाटी पिठीसाखर घालायची. मस्त फेटायचे नंतर त्यात दिड वाटी दूध घालायचे आणि दिड वाटी मिल्क पावडर घालायचे. तसेच अगदी चार थेंब व्हॉनिला इसेंस घालायचे आणि त्यात अर्धा चमचा बेकींग सोडा घाला. 

२. तसेच त्यात अर्धा चमचा बेकींग सोडा घाला आणि सगळं मस्त फेटा. एकजीव करा आणि व्यवस्थित फेटा. तसेच जर जास्त घट्ट झाले तर त्यात दूध घालायचे. मैदा घालायचा आणि मस्त मिक्स करायचा. मैद्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. सगळं छान मिक्स करायचं आणि मग थोडावेळ झाकून ठेवा. जरा घट्ट झाल्यावर त्यात चमचा फिरवायचा. मग एका पातेल्याला तूप लावायचे आणि त्यात तयार केलेले मिश्रण ओतायचे आणि मग कुकरमध्ये केक शिजत लावायचा. 

३. कुकरमध्ये मीठ घालायचे आणि त्यात उलटी ताटली ठेवा त्यावर केक ठेवा आणि मग किमान अर्ध्या तासासाठी ठेवा. कमी गॅसवर ठेवायचे. सुरीने केक झाला आहे का ते तपासायचे आणि मग गार झाल्यावर उलटायचा. मस्त मऊ असा केक होतो. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स