lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > मोजून १० सेकंदात करा अननसाचे सरबत, कसे-पाहा ही सोपी ट्रिक-उन्हाळा होईल गारेगार

मोजून १० सेकंदात करा अननसाचे सरबत, कसे-पाहा ही सोपी ट्रिक-उन्हाळा होईल गारेगार

Home made Pineapple syrup instant juices in 2 minutes : अननसाचे सरबत किंवा ज्यूस प्यावेसे वाटले तर ते झटपट करणं अवघड, म्हणून घ्या ही सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 11:16 AM2024-03-19T11:16:45+5:302024-03-19T12:07:32+5:30

Home made Pineapple syrup instant juices in 2 minutes : अननसाचे सरबत किंवा ज्यूस प्यावेसे वाटले तर ते झटपट करणं अवघड, म्हणून घ्या ही सोपी ट्रिक

Home made Pineapple syrup instant juices in 2 minutes | मोजून १० सेकंदात करा अननसाचे सरबत, कसे-पाहा ही सोपी ट्रिक-उन्हाळा होईल गारेगार

मोजून १० सेकंदात करा अननसाचे सरबत, कसे-पाहा ही सोपी ट्रिक-उन्हाळा होईल गारेगार

उन्हाच्या झळा (Summer Special) बसल्यानंतर आपण बरेच जण थंड पेय पितो. लिंबाचा रस, कलिंगडा रस, मोसंबी, आंबा यासह विविध फळांचा रस आपण आवडीने पितो. घरात ज्यूस तयार करणं शक्य नसल्यामुळे आपण स्टॉलवर जाऊन ज्यूस पितो. पण जर आपल्याला रोजचे ज्यूस पिऊन कंटाळा आला असेल तर, घरात एकदा अननसाचे सिरप (Pineappe Syrup) घरी तयार करून पाहा. एकही जण अननस खाणं टाळतात. अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, तांबे, लोह, पोटॅशियम, फायबर मुबलक प्रमाणात आढळते.

जर लहान मुलं अननस खाताना नाकं मुरडत असतील तर, त्यांच्यासाठी खास अननसाचा सिरप (Cooking Tips) तयार करा. फक्त २ साहित्यात हे सिरप तयार होते. शिवाय महिनाभर आरामात टिकते. जर आपल्याला १० सेकंदात अननसाचं सिरप तयार करायचं असेल तर, एकदा ही रेसिपी पाहाच(Home made Pineapple syrup instant juices in 2 minutes).

अननसाचं सिरप करण्यासाठी लागणारं साहित्य

अननस 

पाणी

पहिल्याच धुण्यात कपड्यांचा रंग फिका पडतो? तुरटीचा करा सोपा उपाय; कपड्यांचा रंग अजिबात जाणार नाही..

साखर 

कृती

- सर्वप्रथम, एका कढईत ४ कप पाणी घाला. त्यात अननसाच्या स्लाईज घाला. त्यावर झाकण ठेऊन १५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्या.

- अननसाचे काप शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.

- आता एका भांडयावर गाळणी ठेवा. गाळणीवर पेस्ट ओतून, त्यावर एक कप पाणी ओता, आणि चमच्याने हलवा. जेणेकरून प्युरी तयार होईल.

- अननसाची प्युरी तयार झाल्यानंतर एका पॅनमध्ये काढून घ्या, व मध्यम आचेवर उकळवत ठेवा.

महागडे फेशिअल-डी टॅन कशाला? टोमॅटो अन् बटाट्याने करा टॅनिंग दूर; १० रुपयात दिसेल तजेलदार चेहरा

- दुसरीकडे एका भांड्यात दीड कप साखर घाला. त्यात एक कप पाणी घालून सतत चमच्याने ढवळत राहा. जेणेकरून पाण्यात साखर विरघळेल, व साखरेचा पाक तयार होईल.

- साखरेचा पाक तयार झाल्यानंतर पॅनमधल्या अननसाच्या प्युरीमध्ये ओतून मिक्स करा. नंतर त्यात एक लिंबाचा रस आणि आवडीनुसार मीठ घाला. अशा प्रकारे अननसाचे सिरप तयार.

- आपण हे सिरप काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेऊ शकता. महिनाभर हे सिरप आरामात टिकते. 

Web Title: Home made Pineapple syrup instant juices in 2 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.