Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > होळी स्पेशल: लाटताना पुरणपोळी फुटू नये म्हणून २ टिप्स, होळी रे होळी करा परफेक्ट पुरणाची पोळी

होळी स्पेशल: लाटताना पुरणपोळी फुटू नये म्हणून २ टिप्स, होळी रे होळी करा परफेक्ट पुरणाची पोळी

Holi Special Puran Poli Recipe: लाटताना पुरणपोळी फुटू नये आणि पोळपाट- लाटणं असं सगळंच चिकट होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा...(how to make perfect puran poli?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2026 12:41 IST2026-02-27T12:40:21+5:302026-02-27T12:41:01+5:30

Holi Special Puran Poli Recipe: लाटताना पुरणपोळी फुटू नये आणि पोळपाट- लाटणं असं सगळंच चिकट होऊ नये म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा...(how to make perfect puran poli?)

holi special puran poli, how to make perfect puran poli, perfect puran poli recipe  | होळी स्पेशल: लाटताना पुरणपोळी फुटू नये म्हणून २ टिप्स, होळी रे होळी करा परफेक्ट पुरणाची पोळी

होळी स्पेशल: लाटताना पुरणपोळी फुटू नये म्हणून २ टिप्स, होळी रे होळी करा परफेक्ट पुरणाची पोळी

Highlightsपुरणपोळी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पोळी अगदी परफेक्ट लाटली जाईल.

होळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. आता होळी म्हटलं की पुरणाची पोळी करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामुळे घरोघरी होळीला आवर्जून पुरणपोळी केली जाते. पण पुरणाची पोळी करायची म्हटलं की अनेक जणींना टेन्शन येतं. कारण त्यांच्या हातचं पुरण अतिशय उत्कृष्ट चवीचं होतं. पण पोळी लाटताना मात्र चांगलाच घोळ होतो. पोळी लाटताना फुटते. त्यामुळे आतलं पुरण बाहेर येतं आणि पोळपाट- लाटणं चिकट होऊन जातं. त्यानंतर एवढा पसारा होतो की पुढच्या पुरणपोळ्या लाटण्याचा मूडच निघून जातो. आता असंच तुमच्या बाबतीत होत असेल तर पुरणपोळी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा (how to make perfect puran poli?). यामुळे पोळी अगदी परफेक्ट लाटली जाईल. एवढंच नाही तर ती भाजताना छान टम्म फुगेल...(Holi Special Puran Poli Recipe)

 

पुरणपोळी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

पुरणपोळी करताना आपण हरबऱ्याची डाळ २ ते ३ वेळा पाण्याने धुवून घेतो आणि नंतर लगेच ती कुकरमध्ये शिजायला लावतो. पण असं करण्याऐवजी डाळ २ ते ३ तास पाण्यात घालून भिजत ठेवा आणि नंतर ती शिजवा. असं केल्याने डाळ आणखी मऊसूत शिजते आणि पुरण अगदी एकजीव होतं.

तरुणपणातच खांदे झुकले - पाठीलाही बाक आला? फक्त १ मिनिटाचा व्यायाम - पाठीचा कणा होईल ताठ

दुसरी गोष्ट म्हणजे कणिक भिजवल्यानंतर तिला तेलाचा हात लावा आणि ती एका पातेल्यामध्ये ठेवा. त्यात भिजवलेली कणिक पुर्णपणे बुडेल एवढं पाणी घाला. अर्ध्या तासानंतर ही कणिक पाण्याबाहेर काढा आणि पुन्हा तेलाचा हात लावून मळून घ्या.

 

यामुळे कणिक खूप मऊसूत होईल आणि जेवढी तुम्ही पोळी लाटाल तेवढी ती अलगद पसरली जाईल. पोळी लाटताना अजिबात फुटणार नाही.

भारतात वाढतंय दुसऱ्या लग्नाचं प्रमाण, कारण प्रत्येकाला पार्टनरमध्ये हवीच आहे 'ही' गोष्ट

कणिक अगदी मऊसूत भिजवली आणि पुरण एकजीव केलं तर पुरणपोळी लाटताना ती फुटण्याची शक्यता खूप कमी होते. शिवाय कणकेचा गोळा घेतल्यानंतर तो अगदी थोडा लाटावा आणि त्यात पुरण भरावं. पोळी लाटताना काठाकाठाने लाटत जावी. जेणेकरून मधला भाग पातळ होऊन ती फाटत नाही. 

 

Web Title : होली स्पेशल: पुरण पोली बेलते समय फटने से बचाने के टिप्स।

Web Summary : दाल को भिगोकर, तेल और पानी से नरम आटा गूंथकर पुरण पोली को फटने से बचाएं। सही परिणाम के लिए किनारों से धीरे-धीरे बेलें।

Web Title : Holi Special: Tips to prevent Puran Poli from tearing while rolling.

Web Summary : Avoid tearing puran poli by soaking dal, kneading soft dough with oil and water. Roll gently from edges for perfect results.