Join us  

होळी स्पेशल : पुरणपोळीसोबत हवीच आंबट- गोड चवीची कटाची आमटी, बघा पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2024 12:57 PM

Holi Special Puran Poli And Katachi Amti: पुरणाचा स्वयंपाकात केली जाणारी कटाची आमटी कशी करायची ते पाहूया. (Katachi amti recipe in marathi)

ठळक मुद्देकटाची आमटी कधी खूपच आंबट होते तर कधी अगदीच पांचट होते. असं होऊ नये म्हणून अगदी अचूक माप घेऊन कटाची आमटी कशी करायची ते पाहा.

बहुतांश घरांमध्ये जेव्हा सणासुदीला पुरणाचा स्वयंपाक केला जातो, तेव्हा त्या स्वयंपाकात एक पदार्थ हमखास असतोच (Holi special puran poli and katachi amti). तो पदार्थ म्हणजे आंबट- गोड चवीची खमंग अशी कटाची आमटी. पुरणाची पोळी, भजी आणि कटाची आमटी असा बेत असेल तर मग खवय्यांची जणू दिवाळीच (How to make Maharashtrian dish katachi amti). ही कटाची आमटी कधी खूपच आंबट होते तर कधी अगदीच पांचट होते. असं होऊ नये म्हणून अगदी अचूक माप घेऊन कटाची आमटी कशी करायची ते पाहा. (Katachi amti recipe in marathi)

कटाची आमटी करण्याची रेसिपी

 

साहित्य

अर्धी वाटी शिजलेलं पुरण

अर्धी वाटी शिजलेली तुरीची डाळ

५ वाटी पाणी

होली आयी रे!! नखांवरचा रंग लवकर निघतच नाही? ३ टिप्स- नखं चटकन होतील स्वच्छ

१ हिरवी मिरची

१ टीस्पून गरम मसाला

१ टेबलस्पून गूळ

१ टेबलस्पून चिंचेचा कोळ

१ टीस्पून जीरेपूड

 

१ टीस्पून धनेपूड

६ ते ७ कडिपत्त्याची पाने

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग

होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...

अर्धा टिस्पून खोबऱ्याचा किस

चवीनुसार मीठ

कृती 

कटाची आमटी करण्यासाठी पुरण आणि शिजलेली तुरीची डाळ एकत्र करून छान एकजीव करून घ्या.

 

यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई चांगली तापली की तेल, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घ्या.

फोडणी झाल्यानंतर कडिपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाका. ते परतून झाले की त्यामध्ये चिंचेचा कोळ टाका.

डाळिंब पिकलेलं, गोड, रसरशीत आहे हे न चिरता कसं ओळखायचं? २ सोप्या टिप्स- करा परफेक्ट खरेदी

यानंतर शिजलेली तुरीची डाळ आणि पुरण टाका आणि पाणी टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.

आता यामध्ये गूळ, काळा मसाला, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून आमटीला चांगली उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करा आणि त्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम, आंबटगोड चवीची कटाची आमटी झाली तयार...  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीहोळी 2024