Join us

Holi 2025: पुरण ऐनवेळी सैल किंवा घट्ट झालं तर? ५ टिप्स- पुरणपोळी होईल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 14:38 IST

Holi Celebration 2025:होळीसाठी पुरणपोळीचा बेत करताय; पण ऐनवेळी पुरण बिघडलं तर? (how to make perfect puranpoli?) अजिबात घाबरू नका.. फक्त या काही टिप्स पाहून ठेवा..(cooking tips for making perfect puran for puranpoli)

ठळक मुद्देऐनवेळी जर पुरण बिघडलं तर नेमकं काय करावं हे पाहा आणि नेहमीसाठी लक्षात असू द्या..

होळी रे होळी....(holi celebration 2025) असं म्हणत आता घरोघरी होळी, रंगपंचमीच्या सणाची तयारी सुरू झालेली आहे. बच्चे कंपनीला तर या सणाचा विशेष उत्साह असतो. कारण पाण्यामध्ये भरपूर धुडगूस घालायला मिळतो (rangpanchami 2025). आता होळीचा आनंद तेव्हाच वाढतो जेव्हा जेवणाच्या पानात गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर साजूक तूप येते (special traditional food for holi). पुरण परफेक्ट जमणं हे तसं थोडं ट्रिकी काम आहे (how to make perfect puranpoli?). कारण कधी पुरण सैलसर होतं तर कधी खूपच जास्त घट्ट होतं. अशा पुरणाची पोळी मग अजिबातच व्यवस्थित जमत नाही आणि जेवणाची सगळी मजाच जाते (Holi Festival 2025 News in Marathi). म्हणूनच ऐनवेळी जर पुरण बिघडलं तर नेमकं काय करावं हे पाहा आणि नेहमीसाठी लक्षात असू द्या..(Holi Celebration in Maharashtra)

 

पुरण सैल किंवा पातळ झालं तर काय करावं?

पुरण थोडं सैलसर झालं म्हणजेच पुरणामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं तर पोळी अजिबात व्यवस्थित लाटता येत नाही. असं पुरण पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही २ गोष्टी करू शकता. सगळ्यात आधी तर पुरण पुन्हा एकदा कढईमध्ये टाका आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून पुरणाला परत चटका द्या.

चणे, राजमा भिजत घालायला विसरलात? घ्या सोपी ट्रिक- २ तासांत मऊसूत होईल कडधान्य 

दुसरा उपाय म्हणजे पुरण एखाद्या स्वच्छ सुती कापडावर पसरवून पंख्याखाली ठेवा. कपडा पुरणातलं जास्तीच पाणी शोषून घेईल. यानंतर हे पुरण काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि जसं लागेल तसं ते फ्रिजमधून काढून त्याच्या पोळ्या करा. यामुळे पुरणामध्ये आणखी थोडा घट्टपणा येईल. 

 

पुरण घट्ट झाल्यास काय करावं?

पुरणाला जर गरजेपेक्षा जास्त चटका दिला गेला तर ते पुरण घट्ट होतं. अशा घट्ट झालेल्या पुरणाच्या पोळ्या थोड्या वातड आणि कडक होतात.

आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

जर तुम्ही शिजवलेलं पुरण थोडं घट्ट झालं असेल तर अशा पुरणामध्ये थोडंस गरम दूध आणि तूप एकत्र करून घाला. एकदम दूध घालू नका. पुरणाचा अंदाज पाहून थोडं थोडं दूध घाला.. पुरण अगदी प्रमाणशीर होईल. 

 

टॅग्स :होळी 2025होलिका दहनअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अध्यात्मिक