Lokmat Sakhi >Food > Holi Special Thandai: गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही!! घ्या सोपी रेसिपी- पाहुणे होतील खुश.. 

Holi Special Thandai: गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही!! घ्या सोपी रेसिपी- पाहुणे होतील खुश.. 

How To Make Holi Special Thandai: होळीनिमित्त थंडाई करण्याचा बेत असेल तर थंडाई करण्याची ही एकअतिशय सोपी रेसिपी एकदा पाहून घ्या..(Holi celebration 2025)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 16:33 IST2025-03-11T16:32:06+5:302025-03-11T16:33:19+5:30

How To Make Holi Special Thandai: होळीनिमित्त थंडाई करण्याचा बेत असेल तर थंडाई करण्याची ही एकअतिशय सोपी रेसिपी एकदा पाहून घ्या..(Holi celebration 2025)

Holi celebration 2025, how to make holi special thandai, holi special thandai recipe, Holi special food | Holi Special Thandai: गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही!! घ्या सोपी रेसिपी- पाहुणे होतील खुश.. 

Holi Special Thandai: गारेगार थंडाईशिवाय होळीची मजाच नाही!! घ्या सोपी रेसिपी- पाहुणे होतील खुश.. 

Highlightsथंडाई तयार करताना आपण त्यात जे काही पदार्थ घालतो त्यामुळे शरीराचं वाढत्या उष्णतेपासून संरक्षण होतं.

आपल्याकडे सणाच्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ केले जातात. या पदार्थांचा संबंध वातावरणात होणाऱ्या बदलांशी सुद्धा असतो. म्हणजेच वातावरणानुसार जे पदार्थ खाणं आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात तेच पदार्थ सणानिमित्त केले जातात, असं बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल. आता हेच पाहा ना होळीचा सण आला की त्यादिवशी पुरणपोळी तर केली जातेच, पण त्यासोबतच रंग खेळताना थंडाईसुद्धा प्यायली जाते (Holi celebration 2025). थंडाई तयार करताना आपण त्यात जे काही पदार्थ घालतो त्यामुळे शरीराचं वाढत्या उष्णतेपासून संरक्षण होतं (how to make holi special thandai?) आणि शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यासाठी मदत होते (holi special thandai recipe). त्यामुळे भारतात बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्र, होळी यानिमित्ताने थंडाई केली जाते. 

होळी स्पेशल थंडाई करण्याची रेसिपी

 

साहित्य

६ ते ८ काजू

८ ते १० बदाम

१ टेबलस्पून खसखस

आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

१ टेबलस्पून टरबूज बिया

२ टीस्पून बडिशेप

४ ते ५ काळी मिरी

 

अर्धा टीस्पून जायफळ पावडर

अर्धा टीस्पून वेलची पावडर

९ ते १० पिस्ते

Holi 2025: पुरण ऐनवेळी सैल किंवा घट्ट झालं तर? ५ टिप्स- पुरणपोळी होईल परफेक्ट

गुलाबाच्या ८ ते १० पाकळ्या

२ ग्लास दूध

८ ते १० केशराच्या काड्या

४ टेबलस्पून साखर

२ टेबलस्पून गुलकंद

 

कृती
सगळ्यात आधी केशराच्या काड्या आणि साखर घालून दूध उकळून थंड करून घ्या. 

हाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

त्यानंतर वर सांगितलेले मसाल्याचे सगळे पदार्थ गरम पाण्यामध्ये ८ ते १० तास भिजू द्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका भांड्यात काजू आणि बदाम घाला आणि ते सुद्धा ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजवून घ्या.

आता मसाल्याचे पदार्थ आणि काजू- बदाम पाण्यामध्ये व्यवस्थित भिजले की सुरुवातीला मसाल्याचे पदार्थ आणि नंतर काजू बदाम आणि गुलकंद असे एकेक करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. अगदी बारीक पेस्ट होईल याची काळजी घ्या.

 

त्यानंतर मसाल्यांची पेस्ट एका सुती कपड्यातून गाळून घ्या. गाळून घेतल्यावर त्यातून जे पाणी निघेल ते आपल्या दुधामध्ये घाला. त्याच दुधामध्ये नंतर काजू- बदामाची पेस्ट घाला. आता सगळं दूध एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.. बर्फाचे तुकडे घालून गारेगार थंडाई सर्व्ह करा.


 

Web Title: Holi celebration 2025, how to make holi special thandai, holi special thandai recipe, Holi special food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.