भारतात घरोघरी आवडीने विविध चटण्या केल्या जातात. प्रत्येक घराची चव, पद्धत आणि आवड वेगळी असल्याने चटणी हा पदार्थ नेहमीच खास मानला जातो. याच चटण्यांपैकी सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना आपल्या चवीने भुरळ घालणारी म्हणजे हॉटेलमध्ये सॅण्डविचसोबत मिळणारी हिरवी चटणी. (Here's a trick to make the same green chutney you get with sandwiches at hotels, check out the awesome recipe)तिचा रंग, सुगंध आणि हलकी तिखट–खमंग चव अशी काही जादू करते की सॅण्डविचची साधी चवही लगेच भारी लागते.
हॉटेलमधली ही हिरवी चटणी इतकी जबरदस्त असते की एणखी एक वाटी आपण मागवून घेतो. अशी अनेकांची समजूत असते की तशी चटणी घरी होत नाही. पण प्रत्यक्षात ती घरी करणे अगदीच सोपे आहे. तिचा आकर्षक हिरवा रंग आणि हलकी चटपटीत चव ही तिची खरी ओळख. कोणत्याही स्नॅक्ससोबत ती अगदी छान लागते सॅण्डविच, पकोडे, डोसा किंवा इतरही पदार्थ. कशासोबतही लावली तरी पदार्थाची चव वाढवतेच. पाहा हॉटेलमध्ये मिळते तशी हिरवी चटणी घरी कशी कराल.
साहित्य
पुदिना, कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची, मीठ, बर्फ, काळिमीरी पूड, लिंबू , धणे - जिरे पूड
कृती
१. कोथिंबीर छान निवडून घ्यायची. देठ ठेवायचे. फक्त खालचा सुकलेला आणि खराब भाग काढायचा. कोवळी कोथिंबीर घ्यायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा तुकडा घ्यायचा. पुदिना छान स्वच्छ धुवायचा आणि निवडायचा.
२. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर जेवढी घ्याल त्याच्या निम्मे पुदिना घ्यायचा. त्यात चमचाभर धणे - जिरे पूड घालायची. थोडी काळीमिरी पूड घालायची. आल्याचा तुकडा घालायचा. तसेच लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. लिंबू पिळायचा. अगदी थोडाच रस घालायचा. मग त्यात ताजे गोडसर दही घालायचे. जास्त नाही अगदी चमचाभर दही घालायचे.
३. पाण्याऐवजी बर्फ वापरा. चटणी गार होते आणि घट्टही होते. चमचाभर मीठ घाला थोडा बर्फ घाला आणि छान वाटून घ्या. छान घट्ट चटणी तयार होते. जरा जास्त वाटायचे म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आणि सगळे पदार्थ वाटले जातात.
