Lokmat Sakhi >Food > आंबोळीसोबत हवीच काळया वाटण्याची उसळ, अस्सल मालवणी चवीची उसळ करण्याची पाहा सोपी रेसिपी

आंबोळीसोबत हवीच काळया वाटण्याची उसळ, अस्सल मालवणी चवीची उसळ करण्याची पाहा सोपी रेसिपी

Here is a simple recipe to make Usal with Amboli : आंबोळी केल्यावर त्याबरोबर ही उसळ तर हवीच. पाहा काय कमाल चव आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 08:35 IST2025-04-14T08:30:38+5:302025-04-14T08:35:02+5:30

Here is a simple recipe to make Usal with Amboli : आंबोळी केल्यावर त्याबरोबर ही उसळ तर हवीच. पाहा काय कमाल चव आहे.

Here is a simple recipe to make Usal with Amboli | आंबोळीसोबत हवीच काळया वाटण्याची उसळ, अस्सल मालवणी चवीची उसळ करण्याची पाहा सोपी रेसिपी

आंबोळीसोबत हवीच काळया वाटण्याची उसळ, अस्सल मालवणी चवीची उसळ करण्याची पाहा सोपी रेसिपी

तुम्ही आंबोळी तर बरेचदा खाल्ली असेल. पण कधी काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी खाल्ली आहे का? हे जगात भारी असं कॉम्बीनेशन एकदा तरी ट्राय करायलाच हवं.(Here is a simple recipe to make Usal with Amboli) चवीला अगदी मस्त आणि झणझणीत असणारी ही उसळ एकदा खाल्ली की खातच राहावी वाटते. इतकी चविष्ट लागते. तयार करायलाही अगदीच सोपी आहे. आंबोळी व उसळ हा बेत आता होऊन जाऊ दे. (Here is a simple recipe to make Usal with Amboli)पाहा ही सोपी रेसिपी. 

साहित्य 
काळे वाटाणे, कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं, पाणी, तेल, लसूण, आलं, कडीपत्ता, लाल तिखट, मीठ 

कृती
१. काळा वाटाणा रात्रभर भिजत घाला. (Here is a simple recipe to make Usal with Amboli)भिजवण्याआधी व्यवस्थित धुऊन घ्या. काळा वाटाणा फार टणक असतो त्यामुळे रात्रभर भिजवावाच लागतो. भिजलेला वाटाणा कुकरमध्ये शिजत लावा. त्यामध्ये शिजवताना थोडा सोडा आणि मीठ घाला वाटाणा छान मऊ होतो. किमान ५ ते ६  शिट्या काढून घ्या.  
२. एका मोठ्या तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडे तेल घ्या. त्यावर लांब चिरलेला कांदा परता. कांदा थोडा परतून झाल्यावर त्यामध्ये लसूण घाला. मग लांब चिरलेला टोमॅटो घाला. सुकं खोबरं घाला. आलं घाला. आलं वापरलं नाही तरी चालेल. 


३. मिश्रण रंग बदलेपर्यंत परतून घ्या. सगळं छान परतून झाल्यावर ते गार करत ठेवा. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओता आणि मस्त वाटून घ्या. पाणी वापरायची गरज नाही. जाड वाटणच तयार करा.

४. एका कढईमध्ये तेल घ्या. त्यामध्ये कडीपत्ता टाका. कडीपत्ता तडतडला की त्यामध्ये तयार केलेले वाटण टाका. वाटण छान खमंग परतून घ्या. त्याचा वास मस्त घुमायला लागला की मग त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. ते आटू द्या. नंतर मीठ घाला. लाल तिखट घाला. सगळं मिक्स करा. मग शिजवलेला काळा वाटाणा घाला. वाटाणा पाण्यासकट घाला. वेगळे पाणी वापरू नका. चव जास्त छान येते. 


५. झाकण ठेवा आणि उसळ छान उकळू द्या. थोड्या वेळात तेलाचा छान सोनेरी तवंग उसळीला येईल. मग गॅस बंद करा आणि मस्त आंबोळीबरोबर खा.  

 

Web Title: Here is a simple recipe to make Usal with Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.