सकाळी नाश्त्याला काय करायचं किंवा मुलांना डब्यात रोज काय नवीन द्यावं हे अनेकवेळा सुचत नाही (How To Make Rava Chila Easy Recipe). घरात रवा असेल तर तुम्ही वाटीभर रवा वापरून झटपट रव्याचा मऊसूत डोसा म्हणजेच रव्याचं धिरडं करू शकता. याला चिला असंही म्हणतात. धिरडं करायला एकदम सोपे आणि टेस्टी असते. (Healthy Rava Chila Recipe)
रव्याचं धिरडं करण्याची सोपी रेसिपी
रव्याचं धिरडं म्हणजेच रव्याचा जाळीदार चिला करण्यासाठी एका भांड्यात दीड कप रवा घ्या, १ वाटी बेसन आणि २ कप पाणी घ्या हे मिश्रण विस्कर किंवा लाकडी घुसळण्याच्या यंत्रानं व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी झाकून ठेवा. जेणेकरून रवा व्यवस्थित फुलेल.
यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीच चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काळीमिरी पूड, चिली फ्लेक्स, चमचाभर जीरं घालून त्यात पाणी घाला. मग व्यवस्थित एकजीव करून घ्या.
नंतर तव्यावर तेल गरम करून ब्रशच्या साहाय्यानं व्यवस्थित ग्रीस करून घ्या. तवा व्यवस्थित गरम झाला तर त्यावर चमच्यानं व्यवस्थित हे मिश्रण घाला. कडेकडेनं हे मिश्रण तव्यावर घाला जेणेकरून डोसा छान कुरकुरीत होईल. नंतर ब्रशच्या साहाय्यानं धिरड्यावर तेल लावून घ्या आणि मग चमच्यानं धिरडं काढा. मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला खाण्यासाठी हा नाश्ता उत्तम पर्याय आहे.
रव्याचं धिरडं परफेक्ट होण्यााठी टिप्स
पिठात इतपत पाणी घाला की ते चमच्यातून ओतल्यावर अगदी सहज पडेल. पीठ खूप घट्ट झाले तर धिरडं जाड होते आणि जाळी पडत नाही.
धिरड्यांसाठी नेहमी बारीक रवा वापरा. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून थोडा फिरवून बारीक करून घ्या. यामुळे धिरडं व्यवस्थित भाजला जातं आणि तुटत नाही.
मिश्रण सेट होण्यासाठी रवा १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा. यामुळे रवा पाणी शोषून घेतो आणि पीठ व्यवस्थित सेट होते. जर पीठ घट्ट वाटलं तर पुन्हा थोडं पाणी घालून ते पातळ करा.
Web Summary : Make soft Rava Dosa, or Chila, easily with semolina (rava), vegetables, and spices. This quick, healthy recipe is perfect for breakfast or lunchboxes. Remember to soak the batter and use fine semolina for best results.
Web Summary : सूजी (रवा), सब्जियों और मसालों के साथ आसानी से नरम रवा डोसा, या चीला बनाएं। यह त्वरित, स्वस्थ रेसिपी नाश्ते या लंचबॉक्स के लिए बिल्कुल सही है। घोल को भिगोना और सर्वोत्तम परिणामों के लिए बारीक सूजी का उपयोग करना याद रखें।