मूगडाळ कटलेट हा लहान मुलांना आवडणारा आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. मूगडाळीत प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि लोक भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे मुलांची वाढ चांगली होते आणि त्यांना ऊर्जा मिळते. (Healthy Cutlet Recipe: These moong dal cutlets are both tasty and nutritious, a special treat for children)हे कटलेट पचायला सोपे आणि हलके असते. तसेच फार चविष्ट असल्याने मुलांना खायला आवडतात. त्यात भाज्या, हर्ब्स आणि मसाले घातल्याने त्याची चव आणखी वाढते तसेच पोषणमूल्येही मिळतात. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मूगडाळ कटलेटमुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यांना आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ खायला मिळतात. हे रेसिपी नक्की करुन पाहा.
साहित्य
मूगडाळ, कांदा, गाजर, आलं, तांदूळ पीठ, हिरवी मिरची, धणे पूड, गरम मसाला, हळद, मीठ, दही, लाल तिखट, तेल
कृती
१. मूगडाळ तासभर भिजत ठेवायची. कांदा सोलून घ्यायचा आणि कांदा छान बारीक चिरुन घ्यायचा. तसेच गाजर सोलायचे आणि गाजर किसून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे आणि आल्याचा लसान तुकडा किसून घ्यायचा.
२. भिजवलेली मूगडाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच किसलेले गाजर घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे आणि किसलेले आलेही त्यात घालायचे. अगदी थोडे तांदूळाचे पीठ घालायचे आणि मग त्यात चवी पुरते मीठ घालायचे. तसेच गरम मसाला घाला आणि लाल तिखट घाला. चमचाभर धणे पूड घाला. सारे पदार्थ एकत्र करा आणि मिक्स करुन घ्या.
३. त्याला जरा घट्टपणा असू द्या. जास्त पातळ करु नका. मिश्रणाचे गोलाकार कटलेट तयार करुन घ्या. जरा जाडच ठेवा जास्त पातळ करु नका. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेलावर कटलेट परतून घ्यायचे. मस्त खमंग आणि कुरकुरीत करायचे. काढून घ्यायचे. आणि त्यावर फेटलेले दही लावायचे. दह्यामुळे चव आणखी छान लागते. करायला अगदी सोपी असलेली ही रेसिपी नक्की करुन पाहा.