Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात हमखास होतो पोटात बिघाड; रोज एक कच्चा कांदा उन्हाळ्यात खाण्याचा पाहा सोपा उपाय

उन्हाळ्यात हमखास होतो पोटात बिघाड; रोज एक कच्चा कांदा उन्हाळ्यात खाण्याचा पाहा सोपा उपाय

Summer Health Tips: कांद्याच्या उग्र वासामुळे आपण सकाळच्या जेवणात कांदा खाणे टाळतो, पण उन्हाळ्यात एक कच्चा कांदा खाल्ल्याने होणारे फायदे वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:37 IST2025-04-08T17:25:47+5:302025-04-08T18:37:47+5:30

Summer Health Tips: कांद्याच्या उग्र वासामुळे आपण सकाळच्या जेवणात कांदा खाणे टाळतो, पण उन्हाळ्यात एक कच्चा कांदा खाल्ल्याने होणारे फायदे वाचून थक्क व्हाल!

Health Tips: Stomach upset is a must in summer; one raw onion every day is the panacea! | उन्हाळ्यात हमखास होतो पोटात बिघाड; रोज एक कच्चा कांदा उन्हाळ्यात खाण्याचा पाहा सोपा उपाय

उन्हाळ्यात हमखास होतो पोटात बिघाड; रोज एक कच्चा कांदा उन्हाळ्यात खाण्याचा पाहा सोपा उपाय

भारतातील जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात कांदा आढळतो आणि त्याशिवाय कोणताही पदार्थ बेचव लागतो. हॉटेलमध्येही तोंडी लावायला कच्चा कांदा दिला जातो. शिवाय कांद्याची कोशिंबीर वा कांदा घालून केलेली कोशिंबीरदेखील घराघरातून केली जाते. सॅलडचा मुख्य घटक आहे कांदा! सकाळी कांदा खाणे टाळत असाल तरी उन्हाळ्यात दिवसभरात एक कांदा दररोज खाल्ल्याने तुम्हाला कोणते फायदे (Benefits of eating onion in summer) मिळू शकतात हे  वाचल्यानंतर तुमच्या रोजच्या डाएटमध्ये तुम्ही तो नक्कीच समाविष्ट कराल!

उन्हाळ्यात आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आपल्या आहारातून अधिक पोषण आवश्यक आहे. उन्हाळ्यात (Summer Health Tips) शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी, टरबूज, काकडी आणि दही यांसारखी पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्या खाव्यात आणि मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळावेत. पण त्याबरोबरच रोज एक कच्चा कांदा तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतो.

उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उष्माघात टाळता येतो. खरंतर कांद्यामध्ये थंडावा असतो, जो उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यास ते मदत करते. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते आणि घाम कमी येतो. म्हणून शेतकरीसुद्धा शेतात काम झाल्यावर झुणका भाकरी आणि कच्चा कांदा ठेचून खातात, तो उन्हाचा त्रास होऊ नये म्हणूनच!

पोषक तत्त्व : 

सल्फर, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि सी ने समृद्ध असलेला कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये पोषक घटक देखील आढळतात, जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात....

शरीराचे तापमान :

उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उष्माघात टाळता येतो. उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कच्चा कांदा शरीराचे तापमान संतुलित करतो आणि उष्माघातापासून तुमचे रक्षण करतो.

शीतलता : 

कांद्याची प्रकृती थंड असते. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने तुम्हाला शरीरात नैसर्गिकरित्या थंडावा जाणवतो. ऊन बाधत नाही आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. 

पचनशक्ती : 

फायबरने समृद्ध असलेला कांदा पचनसंस्था सुधारण्यास मदत करतो. उन्हाळ्यात पोटाच्या समस्या वाढतात. अशा परिस्थितीत ते खाल्ल्याने बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

प्रतिकारक्षमता : 

कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Health Tips: Stomach upset is a must in summer; one raw onion every day is the panacea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.