ड्रायफ्रुट्समध्ये बदाम हे अतिशय आरोग्यदायी आहेत. बदामाचा वापर हा अनेकदा गोड पदार्थ, मिठाई, मिल्कशेक, स्मूदीमध्ये केला जातो. बदाम तुम्ही जसे आहेत तसे खाऊ शकता, भाजून खाऊ शकता किंवा पाण्यात भिजवून देखील खाऊ शकता, कोणत्याही प्रकारे खाल्लं तरी त्याचा फायदा होतोच. लहान मुलांना पाण्यात भिजवलेले बदाम खायला दिल्याने त्यांचा मेंदू तीक्ष्ण होतो. मात्र, काही लोक एका दिवसात खूप बदाम खातात, जे योग्य नाही. बदाम खाण्याचीही योग्य वेळ आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जास्त फायदे मिळवायचे असतील तर ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया...
TOI मध्ये प्रकाशित झालेल्या एका न्यूजनुसार, २३ बदामांमध्ये १६० कॅलरीज, फायबर ३.५ ग्रॅम, हेल्दी फॅट्स १४ ग्रॅम, प्रोटीन ६ ग्रॅम, तसेच कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. विशेषत: बदामाच्या सालीतील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतं
एका दिवसात किती बदाम खावेत?
दिवसभरात मूठभर बदाम खावेत. यामुळे ऊर्जा वाढते. किमान ७ ते ८ बदाम मुठीत आरामात बसू शकतात. दुधात किंवा पाण्यात भिजवलेले बदामही तुम्ही खाऊ शकता. हे देखील खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला असे आवडत नसतील तर तुम्ही जसे आहेत तसे बदाम देखील खाऊ शकता. भाजलेले बदाम खाणे देखील उत्तम आणि आरोग्यदायी पद्धत आहे.
नेमके कधी खावेत बदाम?
TOI नुसार, सकाळी बदाम खाणं चांगलं आहे. विशेषतः रिकाम्या पोटी खाणं जास्त चांगलं आहे. यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते. हा ऊर्जेचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे तुम्ही वर्कआऊट करण्यापूर्वी ते खाऊ शकता. रात्रीच्या वेळी बदाम खाल्ल्यास चांगली झोप येते. यामध्ये असलेले मॅग्नेशियममुळे आरामदायी वाटतं आणि निद्रानाशाची समस्या दूर करते.
बदाम खाण्याची योग्य पद्धत
तुम्ही बदाम सफरचंद किंवा केळीसोबत खाऊ शकता, कारण हा फायबर युक्त नाश्ता असेल. तुम्ही बदाम दूध किंवा दह्यासोबत खाऊ शकता. यामुळे शरीरात कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण वाढेल. डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. हे अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असेल.
खीर, शेवया, हलवा, पुलाव, स्मूदी, शेक इत्यादींमध्ये मिसळूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला भरपूर हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स मिळतील. ज्यांना किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी याचं सेवन करू नये. बदाम हे हृदयविकार, मधुमेहावर फायदेशीर आहेत.