Lokmat Sakhi >Food > ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?

ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?

वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी की ब्लॅक टी कोणती जास्त फायदेशीर आहे हे जाणून घेऊया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:59 IST2025-08-27T16:58:23+5:302025-08-27T16:59:47+5:30

वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी की ब्लॅक टी कोणती जास्त फायदेशीर आहे हे जाणून घेऊया...

health green tea vs black tea health benefits for weight loss and heart health | ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?

ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?

चहा हे जगातील सर्वात जास्त सेवन केलं जाणारं पेय आहे. सकाळच्या ताजेपणा ते दिवसभराचा थकवा दूर करण्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात चहाचं वेगळं महत्त्व आहे. पण जेव्हापासून लोक आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत, तेव्हापासून ग्रीन टी आणि ब्लॅक टी पिण्याचं प्रमाण वाढलं आहे. दोघांची चव, रंग आणि फायदे वेगवेगळे आहेत. वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी की ब्लॅक टी कोणती जास्त फायदेशीर आहे हे जाणून घेऊया...

ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्ही कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून बनवले जातात. फरक फक्त त्यांच्या प्रोसेसिंगमध्ये आहे. ग्रीन टीमध्ये कमी प्रोसेस केली जाते, ज्यामुळे त्यात असलेले कॅटेचिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स सुरक्षित राहतात. दुसरीकडे ब्लॅक टी पूर्णपणे ऑक्सिडाइज्ड असते, ज्यामुळे त्याचा रंग गडद असतो आणि चव असते. याशिवाय ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यात असलेले कॅटेचिन्स आणि विशेषतः EGCG फॅट बर्निंग प्रोत्साहन देतं. हे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास आणि मेटाबॉलिज्मम वाढवण्यास देखील मदत करतात.

ब्लॅक टीचं सेवन हृदयरोग रोखण्यास मदत करतं. त्यात आढळणारे थीफ्लेव्हिन्स आणि थिएरुबिजिन्स हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. नियमित सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारतं. ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. 

अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी करण्यास देखील ती उपयुक्त ठरू शकते. ब्लॅक टीमध्ये ग्रीन टीपेक्षा जास्त कॅफिन असतं. म्हणूनच ते त्वरित ऊर्जा देण्यास आणि मेंदूला सक्रिय ठेवण्यास मदत करतं. सकाळची सुरुवात करण्यासाठी किंवा काम करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्लॅक टी एक चांगला पर्याय मानला जातो. दोन्ही चहामध्ये कॅफिन असतं, ज्याचं जास्त सेवन केल्याने निद्रानाश, चिंता वाढू शकते. 

ब्लॅक टीमुळे दातांवर डाग येऊ शकतात. जेवणानंतर लगेच पिऊ नये. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि ब्लड शुगर कंट्रोल करायची असेल तर ग्रीन टी  तुमच्यासाठी योग्य असू शकते. जर तुमचे ध्येय हृदयाचे आरोग्य सुधारणं आणि पचनसंस्था मजबूत करणं असेल तर ब्लॅक टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, परंतु लक्षात ठेवा की दोन्ही चहा दिवसातून फक्त दोन ते तीन कपच प्या.
 

Web Title: health green tea vs black tea health benefits for weight loss and heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.