पावसाळा म्हणजे भरभरून रानभाज्या मिळण्याचे दिवस. रानात लपलेल्या या भाज्या म्हणजे खऱ्या अर्थाने सुपरफूड असतात. एरवी आपल्याला जे पौष्टिक घटक इतर भाज्यांमधून मिळत नाहीत, ते घटक रानभाज्यांमधून अगदी भरभरून मिळतात. कर्टुले, लाल माठ, चिवळ, टाकळा, कुर्डू, रानभेंडी, घेवडा, अळंगी, आघाडा, आंबाडी, तांदुळ कुंद्रा अशा कित्येक भाज्या या दिवसांत मिळतात. चवीमध्ये बदल म्हणून आणि आरोग्यासाठी फायदेच फायदे म्हणून या भाज्या या दिवसांत हमखास खायलाच हव्या (recipe of making kartoli vegetable). यापैकी कर्टुली ही रानभाजी कशी करायची आणि ती खाल्ल्याने शरीराला कोणकोणते लाभ होतात ते पाहूया..(health benefits of eating ranbhaji kartoli or kantorli)
कर्टुलीची भाजी कशी करायची?
कर्टुली या भाजीला काही भागांमध्ये कंटुर्ली म्हणूनही ओळखले जाते. ही भाजी करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे.
साहित्य
७ ते ८ कर्टुली
मुलांच्या डब्यासाठी चटपटीत 'रोटी रॅप' करण्याचे ४ सोपे प्रकार- चवदार डबा पाहून मुलंही होतील खुश
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे
२ ते ३ हिरव्या मिरच्या
मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून खोबरे
चवीनुसार मीठ
कृती
कर्टुलीचे उभे दोन ते तीन काप करून घ्या आणि त्यातील बिया व जास्तीचा गर काढून टाका. यानंतर कर्टुलीच्या बारीक फोडी करा.
गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तेल, माेहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या. यानंतर कांदा आणि मिरचीची पेस्ट कढईमध्ये घालून परतून घ्या.
महिलांनी ‘या’ वयात तातडीने करायला हवी सर्व्हायकल कॅन्सरची तपासणी, वेळेत ओळखा आजाराची लक्षणं
कांदा परतून झाल्यानंतर कर्टुलीच्या फोडी कढईमध्ये घाला, सगळी भाजी एकदा हलवून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. भाजीला वाफ आल्यानंतर त्यात मीठ घाला आणि पुन्हा एकदा एखाद्या मिनिटासाठी वाफ येऊ द्या. कर्टुली शिजून अगदी मऊ झाली की गॅस बंद करा. सगळ्यात शेवटी त्यावर खोबऱ्याचा किस घाला. कर्टुलीची भाजी झाली तयार.
कर्टुलीची भाजी खाण्याचे फायदे
१. कर्टुलीच्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन्स मिळतात.
२. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कर्टुलीची भाजी फायदेशीर ठरते.
अपचनाचा नेहमीचाच त्रास- पोट फुगून गच्च होतं? रात्री झोपण्यापुर्वी करा ३ उपाय- सकाळी पोट साफ
३. कर्टुलीच्या भाजीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही ती उपयुक्त ठरते.
४. बद्धकोष्ठता, अपचन असा त्रास कमी करण्यासाठीही कर्टुलीची भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो.
५. दमा, त्वचारोग असा त्रास कमी करण्यासाठीही कर्टुली उपयुक्त ठरते.