Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कधी ऐकलं का उलटा वडापाव ? नक्की काय प्रकार ? तेच जिन्नस चव मात्र वेगळी, पाहा रेसिपी

कधी ऐकलं का उलटा वडापाव ? नक्की काय प्रकार ? तेच जिन्नस चव मात्र वेगळी, पाहा रेसिपी

Have you ever heard of Ulta Vada Pav? different taste, see the recipe : उलटा वडापाव करा घरीच. मस्त चव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2026 15:39 IST2026-02-08T15:38:37+5:302026-02-08T15:39:46+5:30

Have you ever heard of Ulta Vada Pav? different taste, see the recipe : उलटा वडापाव करा घरीच. मस्त चव.

Have you ever heard of Ulta Vada Pav? different taste, see the recipe | कधी ऐकलं का उलटा वडापाव ? नक्की काय प्रकार ? तेच जिन्नस चव मात्र वेगळी, पाहा रेसिपी

कधी ऐकलं का उलटा वडापाव ? नक्की काय प्रकार ? तेच जिन्नस चव मात्र वेगळी, पाहा रेसिपी

महाराष्ट्रात फार आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वडापाव. स्वस्तात मस्त असा नाश्ता. सगळेच आवडीने खातात आणि घरी करायलाही अगदी सोपा पदार्थ आहे. आजकाल वडापावचे विविध प्रकार मिळतात. त्यातलाच एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे उलटा वडापाव. नक्की काय प्रकार असतो म्हणून त्याची क्रेझ वाढली (Have you ever heard of Ulta Vada Pav? different taste, see the recipe)आणि आजकाल सगळीकडे मिळतो. करायला अगदी सोपा आहे. सगळी सामग्री सारखीच तरीही चव वेगळी आणि छान लागते. पाहा कसा कराल.  

साहित्य 
बटाटा, पाव, बेसन, आलं, लसूण, कोथिंबीर, मोहरी, पाणी, तेल, हळद, लसूण चटणी, लिंबू, पुदिना, मीठ, हिरवी मिरची 

कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची. त्यात पुदिना घालायचा. तसेच लिंबू रस घालायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. आल्याचा तुकडा घालायचा. थोडा पुदिना घालायचा. त्यात थोडे पाणी घालायचे आणि वाटून चटणी तयार करायची. 

२. बटाटा उकडायचा. सोलून घ्यायचा आणि व्यवस्थित कुस्करायचा. फोडणी पात्रात ठेचलेली भरपूर लसूण, ठेचलेली हिरवी मिरची, आल्याचा ठेचलेला तुकडा असे सारे घ्यायचे. तेल गरम करायचे आणि मोहरी घालायची. तडतडली की त्यात ठेचलेले पदार्थ घालायचे. 

३. चमचाभर हळद घालायची. थोडे मीठ घालायचे. ढवळायचे आणि नंतर ती फोडणी कुस्करलेल्या बटाट्यात घालायची. मिक्स करायचे. व्यवस्थित कालवून घ्यायचे. बेसन कालवून घ्यायचे. त्यात मीठ घालायचे हळद घालायची. जास्त पातळ नाही मध्यम असे मिश्रण तयार करायचे. 

४. पावाला पुदिन्याची चटणी लावायची. लसूण चटणी लावायची. तयार केलेले बटाट्याचे सारण लावायचे. पाव बंद करायचा आणि जरा चेपून चिकटवायचा. नंतर तो बेसनाच्या पीठात घालायचा आणि घोळवून घ्यायचा.  कढईत तेल गरम करायचे छान गरमागरम तेलात सोडायचा आणि तळून घ्यायचा. वडापावपेक्षा वेगळी चव लागते.   

Web Title : उल्टा वड़ा पाव: क्लासिक रेसिपी का एक अनोखा ट्विस्ट

Web Summary : लोकप्रिय उल्टा वड़ा पाव का पता लगाएं! यह नुस्खा परिचित सामग्री का उपयोग करता है लेकिन एक अलग, रमणीय स्वाद प्रदान करता है। बस हरी चटनी, आलू का मिश्रण तैयार करें और बेसन में लपेटा हुआ वड़ा पाव को डीप फ्राई करें। इस स्वादिष्ट बदलाव का आनंद लें!

Web Title : Ulta Vada Pav: A Unique Twist on the Classic Recipe

Web Summary : Discover the popular Ulta Vada Pav! This recipe uses familiar ingredients but offers a different, delightful taste. Simply prepare green chutney, potato mixture and batter coated vada pav then deep fry. Enjoy this delicious variation!