सोयाबीनचा खीमा हा एक अतिशय सोपा आणि चवीला मस्त लागणारा पदार्थ आहे. ज्यांना पौष्टिक, पोटभर आणि वेगळ्या चवीचा पर्याय हवा असतो, त्यांच्यासाठी सोयाबीनचा खीमा प्रोटीनसाठी नक्कीच चांगला असतो. (Have you ever eaten soybean kheema? It's very tasty and easy to make, just like the one you get in the hotel )त्यात आवडत्या भाज्या घालून शकता. सोयाबीनचा खीमा करण्यासाठी जास्त किचकट तयारी लागत नाही. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकात, अचानक पाहुणे आले असतील किंवा वेगळं काही करायचं असेल, तर सोयाबीनचा खीमा पटकन करता येतो. कमी वेळात तयार होणारा आणि सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ नक्की करुन पाहा.
साहित्य सोयाबिन, पाणी, दही, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, तेल, लसूण, कांदा, मोहरी, टोमॅटो, आलं, लिंबू
कृती१. एका पातेल्यात पाणी गरम करायचे. त्याच चमचाभर मीठ घालायचे. तसेच सोयाबीन घालून उकळून घ्यायचे. सोयाबीनचा लगदा करायचा. त्यातून पाणी काढून टाकायचे. एका परातीत सोयाबीन घ्यायचे. त्यात दही घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तसेच त्यात चमचाभर हळद घालायची. चमचाभर गरम मसाला घालायचा. तसेच लाल तिखट घालायचे. आलं लसूण पेस्ट तयार करायची आणि चमचाभर घालायची. मिश्रण छान कालवून घ्यायचे. कालवून एकजीव केल्यावर दहा मिनिटे झाकून ठेवायचे.
२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. टोमॅटोही बारीक चिरुन घ्यायचा. लसणाचेही बारीक काप करायचे. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात त्यात लसूण घालायचा. तसेच कांदाही घालायचा. मस्त परतून घ्यायचे. नंतर त्यात टोमॅटो घालायचा. छान परतून घ्यायचा.
३. कांदा, टोमॅटो मस्त परतून झाल्यावर त्यात तयार केलेले सोयाबीनचे मिश्रण घालायचे. ढवळून घ्यायचे आणि छान परतायचे. लिंबाचा थोडा रस घालायचा. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गरमागरम खायचे.
Web Summary : Soybean kheema is a simple, delicious, and nutritious dish, perfect for a quick meal. This protein-rich vegetarian option requires minimal preparation. The recipe involves boiling soybeans, mixing them with spices and yogurt, and then sautéing with onions, tomatoes, and other seasonings. Ready in minutes!
Web Summary : सोयाबीन खीमा एक सरल, स्वादिष्ट और पौष्टिक व्यंजन है, जो झटपट भोजन के लिए एकदम सही है। यह प्रोटीन से भरपूर शाकाहारी विकल्प कम तैयारी में बन जाता है। सोयाबीन उबालकर, मसालों और दही में मिलाकर, फिर प्याज, टमाटर और अन्य मसालों के साथ भूनें। मिनटों में तैयार!