खाद्यपदार्थांमध्ये जरा वेगळेपण असलं की ते खायला एकदम मज्जा येते. नेहमी तेच तेच पदार्थ खावे लागले तर मग जेवणामध्ये चव व मज्जा येत नाही. (Have you ever eaten Sorak? A special Goan dish, see the recipe - you will fall in love after eating it)आपल्या रोजच्या आहारामध्ये भात असतोच. पण भातावर घ्यायला रोज कोणती वेगळी डाळ किंवा आमटी तयार करायची? असा प्रश्न पडतो. वेगवेगळ्या फोडण्या देऊन मग आपण आमटी तयार करतो. (Have you ever eaten Sorak? A special Goan dish, see the recipe - you will fall in love after eating it)एखादा दिवस रस भाजी करायची म्हणजे आमटीला सुट्टी.
गोव्याला तसेच कोकणात भात हे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे भात रोज हवाच. भाताबरोबर काही तरी वेगळे हवे म्हणून अनेक विविध रेसिपी तेथे केल्या जातात. अशीच एक रेसिपी म्हणजे गोवन सोराक. तळ कोकणातही ही रेसिपी फार चवीने खाल्ली जाते. तयार करायला अगदीच सोपी आहे. सोराक साधाही तयार करतात आणि त्यामध्ये शेवगा घालूनही तयार करतात. शेवगा घातलेला सोराक पाहूया.
साहित्यशेवग्याच्या शेंगा, मीठ, पाणी, कांदा, लसूण, आलं, काश्मीरी लाल मिरची, ओलं खोबरं, हळद, धणे, जिरे, तेल, गूळ, चिंच
कृती१. शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घ्या. ते मीठ लावून बाजूला ठेवा. शेंगा व्यवस्थित धुवा मगच वापरा.
२. मिक्सरचं भांड घ्या. त्यामध्ये खवलेले ओले खोबरे घाला, त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घाला.
३. एका कढईमध्ये तेल घ्या. त्यावरती बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा छान परतून घ्या. मग त्यामध्ये शेंगा घाला. थोडावेळ परता नंतर त्यामध्ये पाणी घाला आणि शेंगा छान शिजवून घ्या.
४. शेंगा शिजल्या की त्यामध्ये वाटण घाला. थोडा गूळ घाला. पाणी घाला. हळद घाला. चवीसाठी मीठ घाला. सगळं छान ढवळून घ्या. नंतर पाणी घाला आणि त्यावरती झाकण ठेवा. वाफ काढून घ्या. सगळं छान शिजलं की मस्त गरमागरम भाताबरोबर खा.