अख्खा मसूर ही भाजी तशी खार लोकप्रिय आहे. मसूर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फार आवडीने खाल्ला जातो. हा मसूर फार पौष्टिक असतो. (Have you ever eaten masoor pulao cooked in coconut milk? Easy and amazing recipe)त्यामुळे आहारात नक्की असावा. तसेच त्याचे विविध पदार्थही तयार करता येतात. एकदा मसूर पुलाव नक्की करुन पाहा. चवीला मस्त असतो आणि करायला अगदीच सोपा आहे.
साहित्य
अख्खा मसूर, तांदूळ, तूप, तमालपत्र, दालचिनी, चक्रफुल, वेलची, काळीमिरी, लवंग, कांदा, आलं, लसूण, लाल तिखट, हळद, टोमॅटो, गरम मसाला, पाणी, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर , नारळाचे दूध
कृती
१. कांदा सोलायचा आणि अगदी बारीक चिरुन घ्यायचा. तसेच आल्याचा तुकडा घ्यायचा सोलून घेतला तरी चालेल. लसणाच्या काही पाकळ्या सोला आणि आले - लसूण पेस्ट तयार करुन घ्या. टोमॅटोही बारीक चिरुन घ्या. नारळाचे दूध करुन घ्या अगदी सोपे असते. ओला नारळ आणि पाणी मिक्सरमधून फिरवा स्वच्छ फडक्याने गाळा आणि चोथा काढून टाका. कोथिंबीरही बारीक चिरुन घ्या.
२. एका मोठ्या खोलगट कढईत चमचाभर तेल घ्या. तेल जरा गरम झाल्यावर त्यात दालचिनीचा तुकडा, चक्रफुल, काळीमिरी, लवंग, तमालपत्र घाला आणि मसाले छान खमंग परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा गुलाबीसर परतून घ्या. त्यात टोमॅटो घाला चमचाभर गरम मसाला, चवीपुरते मीठ घाला. आलं - लसूण पेस्ट हळद आणि लाल तिखट घाला. सगळे पदार्थ छान परतून घ्यायचे.
३. तांदूळ धुवायचे आणि थोडावेळ भिजत ठेवायचे. बासमती तांदूळ वापरला तर उत्तम साधा तांदूळही चविष्टच लागतो. कढईत वाटीभर मसूर आणि वाटीभर तांदूळ घाला. छान परतून घ्या. परतून झाल्यावर त्यात नारळाचे दूध घाला आणि झाकण ठेवा. जरा उकळी आल्यावर लांब चिरेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुलाव छान शिजू द्या. तयार झाला की गरमागरम सर्व्ह करा.
