रवा केसरी हलवा हा दक्षिण भारतात विशेष लोकप्रिय असलेला गोड पदार्थ आहे, जो आकर्षक रंग, सुगंध आणि मऊसर टेक्स्चरमुळे सर्वांच्या आवडीचा बनला आहे. सण-उत्सव, पूजा किंवा खास प्रसंगी हा पदार्थ हमखास तयार केला जातो. (Have you ever eaten kesari rava, a festive dish? It's so soft and tasty, must try recipe)हा हलवा मुख्यतः रव्याचा बनवला जातो, त्यामुळे तो हलका आणि पचायला तुलनेने सोपा आहे. त्यात तूप, साखर आणि सुकामेवा यांचा वापर असल्याने त्याची चव अधिक समृद्ध आणि खमंग होते. करायला अगदी सोपा आहे. पाहा रेसिपी.
साहित्य
तूप, काजू, मनुका, रवा, पाणी, साखर, वेलची पूड
कृती
१. एका पॅनमध्ये थोडे तूप घ्यायचे. तूप जरा पातळ झाले की त्यावर मनुका परतून घ्यायच्या. काजूचे तुकडे करायचे आणि काजूचे तुकडेही मस्त परतून घ्यायचे. दोन्ही पदार्थ बाजूला काढून ठेवायचे. मग अजून चमचाभर तूप घ्यायचे आणि त्यावर रवा परतायचा. रवाही छान खमंग परतायचा.
२. रवा दहा मिनिटे तरी परतायचा. मस्त खमंग परतायचा. रंग जरा बदलतो मग रवा बाजूला काढून ठेवायचा. त्याच पॅनमध्ये पाणी घ्यायचे. रवा जर वाटीभर असेल तर दोन ते तीन वाट्या पाणी घ्यायचे. पाणी जरा उकळले की त्यात रवा घालायचा आणि मस्त मिक्स करायचा.
३. रवा जरा फुलायला लागला की त्यात साखर घालायची. ढवळून घ्यायचे आणि साखर विरघळू द्यायची. त्यात परतलेले काजू घालायचे. तसेच परतलेल्या मनुकाही घालायच्या. चमचाभर वेलची पूड घालायची झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची.
४. गरजेनुसार पाणी घालायचे. जरा सैलसर आणि पातळच हलवा करायचा. शिरा जसा घट्ट असतो तसे करायचे नाही. छान रंग यावा यासाठी केसरी रंग घालून शकता. केशरही घालू शकता. नक्की करुन पाहा.
