Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पौष्टिक ब्रेड पकोडा कधी खाल्ला का? करुन पाहा ही झटपट आणि चविष्ट रेसिपी

पौष्टिक ब्रेड पकोडा कधी खाल्ला का? करुन पाहा ही झटपट आणि चविष्ट रेसिपी

Have you ever eaten healthy bread pakoda? Try this quick and tasty recipe : एकदा असा ब्रेड पकोडा करुन पाहा. एकदम चविष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2025 12:26 IST2025-10-07T12:25:39+5:302025-10-07T12:26:22+5:30

Have you ever eaten healthy bread pakoda? Try this quick and tasty recipe : एकदा असा ब्रेड पकोडा करुन पाहा. एकदम चविष्ट.

Have you ever eaten healthy bread pakoda? Try this quick and tasty recipe | पौष्टिक ब्रेड पकोडा कधी खाल्ला का? करुन पाहा ही झटपट आणि चविष्ट रेसिपी

पौष्टिक ब्रेड पकोडा कधी खाल्ला का? करुन पाहा ही झटपट आणि चविष्ट रेसिपी

नाश्त्यासाठी काही तरी छान असे पदार्थ करायला सगळ्यांनाच आवडतात. मात्र त्यात भाज्या असल्या की लहान मुले खायला कुरकुर करतात. (Have you ever eaten healthy bread pakoda? Try this quick and tasty recipe)अशावेळी या ब्रेड पकोड्यासारख्या रेसिपी करायच्या. त्यात लपवलेल्या भाज्या मुलांना कळतही नाहीत कारण चव मस्त असते. तसेच पौष्टिकही असते. दुधी भोपळा आणि गाजर घालून मस्त पौष्टिक नाश्ता तयार करा पाहा काय करायचे. अगदी सोपी रेसिपी.   

साहित्य 
ब्रेड, गाजर, दुधी भोपळा, कांदा, कोथिंबीर, सातूचे पीठ, बेसन, पांढरे तीळ, पाणी, तूप, चीज, लाल तिखट, हळद, गरम मसाला, पाणी

कृती
१. गाजर सोलून घ्यायचे. सोलून झाल्यावर मस्त किसायचे. तसेच दुधी भोपळाही किसून घ्यायचा. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. कोथिंबीरीची ताजी जुडी आणा आणि चिरुन घ्या. 

२. एका खोलगट पातेल्यात किसलेला दुधी भोपळा घ्यायचा. त्यात किसलेले गाजर घालायचे. तसेच बारीक चिरलेला कांदा घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला. दोन चमचे सातूचे पीठ घाला तसेच दोन चमचे बेसन घाला. थोडे पांढरे तीळ घाला आणि चमचाभर लाल तिखट घाला. हळदही घाला आणि थोडा गरम मसाला घाला. सारे पदार्थ छान मिक्स करायचे. 

३. मिश्रणात थोडे पाणी घालायचे आणि कालवून घ्यायचे.  जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. जरा घट्टच भिजवायचे. ब्रेड घ्यायचा आणि ब्रेडला दोन्ही बाजूने तयार तयार केलेले पीठ लावायचे. त्यावर थोडे चीज लावायचे आणि दुसरा ब्रेड त्यावर ठेवायचा. 

४. तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडे तूप घ्यायचे. तुपावर तयार केलेले ब्रेडचे तुकडे लावायचे आणि दोन्ही बाजूंनी परतायचे. छान खमंग आणि खुसखुशीत करायचे. जरा कुरकरीत होऊ द्यायचे. झाल्यावर काढून घ्यायचे आणि सुरीने त्याचे तुकडे करायचे. सॉससोबत खाऊ शकता तसेच नुसतेही खाऊ शकता. हिरवी चटणी करुन त्यासोबतही खाऊ शकता. नक्की करुन पाहा. 

Web Title : पौष्टिक ब्रेड पकोड़ा: झटपट और स्वादिष्ट नाश्ते की रेसिपी

Web Summary : लौकी और गाजर जैसी छिपी सब्जियों के साथ पौष्टिक ब्रेड पकोड़ा बनाएं। बेसन, मसालों के साथ कद्दूकस की हुई सब्जियों को मिलाएं और सुनहरा होने तक भूनें। चटनी या सॉस के साथ गरमागरम परोसें, यह स्वादिष्ट और स्वस्थ नाश्ता है।

Web Title : Healthy Bread Pakoda: Quick, Tasty Recipe for a Nutritious Snack

Web Summary : Make nutritious bread pakoda with hidden veggies like gourd and carrots. Mix grated vegetables with gram flour, spices, and saute until golden. Serve hot with chutney or sauce for a delicious, healthy snack.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.