Lokmat Sakhi >Food > हिरवी भेळ कधी खाल्ली का? खास चटणीची कमाल आणि चव एकदम बेमीसाल

हिरवी भेळ कधी खाल्ली का? खास चटणीची कमाल आणि चव एकदम बेमीसाल

Have you ever eaten green bhel? The special chutney is amazing and the taste is absolutely unmatched : हिरवी भेळ करायची अगदी सोपी रेसिपी. चवीला अगदी मस्त आणि चटपटीत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2025 18:02 IST2025-06-06T18:02:05+5:302025-06-06T18:02:38+5:30

Have you ever eaten green bhel? The special chutney is amazing and the taste is absolutely unmatched : हिरवी भेळ करायची अगदी सोपी रेसिपी. चवीला अगदी मस्त आणि चटपटीत.

Have you ever eaten green bhel? The special chutney is amazing and the taste is absolutely unmatched | हिरवी भेळ कधी खाल्ली का? खास चटणीची कमाल आणि चव एकदम बेमीसाल

हिरवी भेळ कधी खाल्ली का? खास चटणीची कमाल आणि चव एकदम बेमीसाल

चाटचे पदार्थ ऐकल्यावरच तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी शेवपुरी असे अनेक प्रकार असतात. त्यापैकीच एक म्हणजे भेळ. (Have you ever eaten green bhel? The special chutney is amazing and the taste is absolutely unmatched)भेळ करण्याच्याही अनेक पद्धती आहेत. चुरमुऱ्यांची हलकी फुलकी भेळ करता येते तर भरपूर भाज्या घातलेली पोटभरीची भेळही करता येते. कधी हिरवी भेळ खाल्ली आहे का? चवीला मस्त असते. पाहा कशी करायची. 

साहित्य
चुरमुरे, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, मीठ, बटाटा, चाट मसाला, लिंबाचा रस, साखर, पाणी, हिरवी मिरची, शेंगदाणे, शेव, आलं

कृती
१. आधी हिरव्या भेळेसाठी हिरवी चटणी तयार करुन घ्यायची. त्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि थोडे दाणे लागतात. ताजी कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. त्यात आल्याचा तुकडा घालायचा. थोडे शेंगदाणे घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. त्यात थोडे मीठ घालायचे. पाणी घालायचे. सगळे पजार्थ छान वाटून घ्यायचे. सगळे एकजीव होईल एवढे पाणी घाला आणि जास्त पातळ करु नका. एका वाटीच चमचाभर साखर घ्या. त्यात थोडे पाणी घाला.  

२. कांदा अगदी बारीक चिरायचा. काकडी तपासायची छान गोड काकडी सोलायची. तिचे बारीक तुकडे करायचे. टोमॅटोही बारीक चिरायचा. बटाटा उकडायचा. उकडलेल्या बटाट्याची साले काढून घ्यायची. बटाटा कुसकरायचा नाही त्याचे तुकडे करायचे. चिरुन घ्यायचे. शेंगदाणे छान परतायचे. परतून झाल्यावर दाण्यांची साले काढायची. दाण्यांना जरा मीठ लावायचे आणि दाणे मस्त सुकेच ठेवायचे. 

३. एका पातेल्यात चुरमुरे घ्यायचे. त्यात चिरलेला कांदा घालायचा. टोमॅटो घालायचा आणि काकडीचे तुकडेही घालायचे. त्यात बटाट्याचे उकडलेले तुकडे घालायचे. परतलेले शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे घातल्यावर सगळे पदार्थ छान मिक्स करायचे. 

४. त्यात हिरवी चटणी घालायची. चटणी तुमच्या आवडीनुसार घाला. कमी जास्त तुम्हीच ठरवा. चटणी घातल्यावर साखरेचे पाणी त्यात घालायचे. मग लिंबाचा रस पिळायचा. तसेच त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. लाल तिखट घाला. मीठ घाला. चाट मसाला घाला. व्यवस्थित कालवून घ्या. कालवून झाल्यावर त्यात वरतून शेव घालायची. शेव आणि फरसाण घातले तरी चव मस्त लागेल. सगळे पदार्थ छाम मिक्स झाल्यावर भेळ लगेच खायला घ्यायची. मऊ पडू  देऊ नका.          

Web Title: Have you ever eaten green bhel? The special chutney is amazing and the taste is absolutely unmatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.