पोहे हा हलका, स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे. महाराष्ट्र, इंदौर आणि इतर राज्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी खूप लोकप्रिय आहे. कांदेपोहे, दडपे पोहे, बटाटे पोहे तसेच वांगी पोहे असे विविध प्रकार त्यात आहेत. (Have you ever eaten delicious eggplant poha? A great breakfast dish, easy to make)यात हळद, मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस हे पदार्थ महत्त्वाचे बाकी प्रत्येकाची पद्धत वेगळी. पोहे हलके असतात, पचनास सोपे आणि थोडक्यात सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. एकदा वांगी पोहेही करुन पाहा. चवीला फार सुंदर असतात. नक्की करा.
साहित्य वांगी, पोहे, हिरवी मिरची, कांदा, शेंगदाणे, तेल, पाणी, मोहरी, कडीपत्ता, हळद, मीठ, कोथिंबीर, लिंबू, मटार
कृती१. छान पिकलेली जांभळी वांगी घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि चिरायची. छान काप करुन घ्यायचे. पोहे अगदी स्वच्छ धुवायचे. पाणी काढून टाकायचे आणि पोहे छान निथळत ठेवायचे. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. मटार सोलून घ्यायचे. कोथिंबीरीची जुडी घ्यायची आणि निवडायची. कोथिंबीरही बारीक चिरायची.
२. एका कढईत थोडे तेल घ्या. त्यावर वांग्याचे तुकडे परतून घ्या. अगदी थोडी हळद घाला. छान खमंग परतून घ्या. मग एका ताटात काढून घ्या आणि मग त्याच कढईत चमचाभर तेल घ्या. मोहरी घाला, छान तडतडली की त्यात कडीपत्ता घाला. छान परतून घ्या. शेंगदाणे घाला आणि छान परता. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. कांदा छान गुलाबी झाल्यावर त्यात मीठ घाला. गरजे पुरती हळद घाला. मटार घाला आणि एक वाफ काढून घ्या.
३. मटार मस्त शिजू द्या. त्यात वांगी घाला आणि मग पोहे घाला. पाण्याचा हपका मारा आणि लिंबाचा रसही घाला. बारीक चिरलेली कोथींबीर घाला. एक वाफ काढून घ्या. चवी पुरते मीठ घाला. ढवळून घ्या. सर्व्ह करताना छान पिवळी शेव वर घाला.
Web Summary : Vangi Poha, a variation of the popular Maharashtrian breakfast, is easy to make. Eggplant, spices, and poha combine for a flavorful, light dish. Perfect with lemon and coriander.
Web Summary : वांगी पोहा, महाराष्ट्र का लोकप्रिय नाश्ता, बनाने में आसान है। बैंगन, मसाले और पोहा मिलकर एक स्वादिष्ट और हल्का व्यंजन बनाते हैं। नींबू और धनिया के साथ परोसें।