Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > धण्याची चटणी कधी खाल्ली आहे? खाऊन तर पाहा, पोट रोज होईल साफ आणि मिळेल ताकद

धण्याची चटणी कधी खाल्ली आहे? खाऊन तर पाहा, पोट रोज होईल साफ आणि मिळेल ताकद

Have you ever eaten coriander seeds chutney? If you eat it, you will see that your stomach will be clean every day and you will gain strength : धण्याची अशी सुकी चटणी नक्की खाऊन पाहा. पौष्टिक आणि चवदार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 15:08 IST2025-06-17T15:07:58+5:302025-06-17T15:08:33+5:30

Have you ever eaten coriander seeds chutney? If you eat it, you will see that your stomach will be clean every day and you will gain strength : धण्याची अशी सुकी चटणी नक्की खाऊन पाहा. पौष्टिक आणि चवदार.

Have you ever eaten coriander seeds chutney? If you eat it, you will see that your stomach will be clean every day and you will gain strength. | धण्याची चटणी कधी खाल्ली आहे? खाऊन तर पाहा, पोट रोज होईल साफ आणि मिळेल ताकद

धण्याची चटणी कधी खाल्ली आहे? खाऊन तर पाहा, पोट रोज होईल साफ आणि मिळेल ताकद

ही चटणी पोळी, भात, भाकरी सगळ्यासोबत खाता येते. (Have you ever eaten coriander seeds chutney? If you eat it, you will see that your stomach will be clean every day and you will gain strength.)तसेच भाजीत आमटीत घालायलाही हरकत नाही. याला भारतातील काही ठिकाणी बुखनो या नावाने ओळखले जाते. धण्याची चटणी चवीला मस्त लागते. पण ही चटणी पोटासाठी फार फायद्याची असते. पचन होण्यासाठी उपयुक्त ठरते. एकदा केली की टिकतेही अनेक महिने. पाहा सोपी रेसिपी.  

साहित्य 
धणे, मोहरी, जिरे, मेथी दाणे, लसूण, हळद, मीठ, लाल मिरची, तेल, काश्मीरी लाल मिरची

प्रमाण घेताना जर धणे वाटीभर घेतले असतील तर, मोहरी अर्धी वाटी घ्यायची. तसेच जिरे तीन ते चार चमचे घ्यायचे. मेथी कमी घ्यायची. नाही तर चटणी कडू होईल. चमचाभर मेथीचे दाणे खुप झाले. लसूण मात्र भरपूर घ्यायची. सात ते आठ पाकळ्या घ्यायच्या. हळद चमचाभर घ्यायची. मीठ चवी पुरते घ्यायचे. लाल मिरची दोन ते तीन घ्यायच्या. काश्मीरी लाल मिरचीही दोन घ्या. 

कृती
१. एका कढईत किंवा खोलगट पॅनमध्ये धणे घ्यायचे. वाटीभर धणे छान परतायचे. परतून झाल्यावर त्यात मोहरीचे दाणे घालायचे. गॅस अगदी कमी ठेवायचा. त्यात जिरे घालायचे. पदार्थ छान ढवळायचे. त्यात मेथीचे काही दाणे घालायचे. लाल मिरचीचे देठ काढून टाकायचे. हवे तर थोड्या बियाही कमी करु शकता. लाल मिरची मिश्रणात घालायची. त्यात काश्मीरी लाल मिरचीसुद्धा घालायची आणि परतायचे. सगळे मसाले छान परतले गेले की गार करत ठेवायचे. तेल पाणी काही घालायची आवश्यकता नाही. 

२. तयार मसाला एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. त्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर हळद घालायची. आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे. छान सरसरीत पूड तयार करायची. मस्त अशी चटणी तयार होईल. रंगही छान पिवळा येतो. चटणी तयार झाल्यावर त्यात वरुन दोन ते तीन चमचे कच्चे तेल घालायचे. तेल घातल्यावर हाताने चटणी मस्त मळायची. तेल छान जिरले आणि चटणी मोकळी झाली की हवाबंद डब्यात साठवायची. 

Web Title: Have you ever eaten coriander seeds chutney? If you eat it, you will see that your stomach will be clean every day and you will gain strength.