Join us

अळकुड्यांच्या काचऱ्या कधी खाल्ल्या आहेत का? पाहा अळकुड्यांच्या चमचमीत काचऱ्या करण्याची पारंपरिक पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 17:52 IST

Have you ever eaten arbi fry? See the traditional method of making delicious fried arbi : चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तर खायलाच हवेत. पाहा अरबीची मस्त रेसिपी.

अळकुडी (arbi) हे एक पौष्टिक आणि लोकप्रिय कंद आहे. ते विविध प्रकारे खाता येते. या भाजीत कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, जीवनसत्त्व सी आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम सारख्या महत्त्वाच्या खनिजांचा समावेश आहे. अळकुडीचा आहारात समावेश केल्याने पचनसंस्थेला फायदा होतो. कारण यात असलेला फायबर्स पचन क्रिया सोपी करतात. (Have you ever eaten arbi fry? See the traditional method of making delicious fried arbi)यामध्ये कमी फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. अळकुडी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराच्या मेटाबोलिझमला चालना देण्यास मदत करते. तसेच, हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचे ठरते. अळकुड्या शिजवून तर खात असालच, मात्र त्याचे असे चविष्ट कापही करता येतात. नक्की करुन पाहा.  साहित्य अळकुडी(अरबी), मीठ, पाणी, लाल तिखट, हळद, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, कडीपत्ता

कृती१. अळकुडी स्वच्छ करायला फार वेळ लागतो. अळकुडी धुवायची आणि मग त्याची सालं काढून घ्यायची. सालं काढल्यावर ओल्या फडक्याने पुसायचे. तसेच त्याचे काप करुन घ्यायचे. ते काप एका पातेल्यात घ्यायचे. त्यात पाणी घालायचे आणि अळकुड्या उकळून घ्यायच्या. अति पातळ होतील किंवा मऊ होतील एवढ्या उकळू नका. मध्यम उकळा. फक्त शिजतील एवढेच उकळा. उकळून झाल्यावर त्या एका कॉटनच्या कापडावर घ्या. त्यातील पाणी आधीच काढायचे. सुक्या फडक्याने त्या पुसून घ्यायच्या. 

२. एका पॅन मध्ये तेल घ्यायचे. तेलावर थोडा कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता मस्त फुलू द्यायचा. नंतर त्यात अळकुड्यांचे काप घालायचे आणि छान परतायचे. जरा परतले गेले की त्यात थोडे लाल तिखट घालायचे. तसेच धणे पूड घालायची. जिरे पूड घालायची आणि हळद घालायची. तसेच चमचाभर गरम मसाला घालायचा. चवी पुरते मीठ घालायचे आणि छान ढवळायचे. सारे मसाले छान मिक्स करायचे.  

३. काप छान खमंग परतायचे. एकदा झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायचे. नंतर मध्यम आचेवर थोडावेळ परतायचे. एकदम मस्त परतायचे. मसाले आणि काप छान एकजीव करायचे. काप चवीला फारच मस्त लागतात. तसेच तेल कमी घातले तर पौष्टिकही ठरतात.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स