Lokmat Sakhi >Food > हरतालिकेच्या उपवासाचे नियम; काय खायचं काय टाळायचं पाहा-ना पित्त होणार ना थकवा येणार

हरतालिकेच्या उपवासाचे नियम; काय खायचं काय टाळायचं पाहा-ना पित्त होणार ना थकवा येणार

Hartalika teej 2025 : (What can we eat in hartalika fast) What are the rules for Hartalika : उपवास म्हणजे शरीराला विश्रांती देणे, पण त्याच वेळी शरीराचे पोषणही जपले पाहिजे. fast

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:50 IST2025-08-25T11:36:51+5:302025-08-25T11:50:51+5:30

Hartalika teej 2025 : (What can we eat in hartalika fast) What are the rules for Hartalika : उपवास म्हणजे शरीराला विश्रांती देणे, पण त्याच वेळी शरीराचे पोषणही जपले पाहिजे. fast

Hartalika teej 2025 : Hartalika Fasting Rules Food Rules To Follow While Fasting | हरतालिकेच्या उपवासाचे नियम; काय खायचं काय टाळायचं पाहा-ना पित्त होणार ना थकवा येणार

हरतालिकेच्या उपवासाचे नियम; काय खायचं काय टाळायचं पाहा-ना पित्त होणार ना थकवा येणार

गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2025) एक दिवस आधी येणारा हरतालिका (Hartalika teej 2025) हा सण महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी एक खास दिवस असतो. या दिवशी अनेकजणी निर्जळी उपवास करतात. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आरोग्याच्या दृष्टीने कशी सांभाळावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उपवास म्हणजे शरीराला विश्रांती देणे, पण त्याच वेळी शरीराचे पोषणही जपले पाहिजे. (Hartalika Fasting Rules)

त्यामुळे उपवासाच्या दिवशी नेमकं काय खावं आणि काय टाळावं, हे समजून घेणं गरजेचं आहे. गणेशोत्सवाची तयारी, डेकोरेशन, आवराआवर खूपच असते. (Hartalika Vrat) अशात उपवासामुळे शरीराला थकवा येऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये, शरीर एनर्जेटीक राहावं असं वाटत असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (Rules To Follow While Fasting)

उपवासाच्या दिवशी काय खावे? (What can we eat in hartalika fast)

उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग्य पदार्थांची निवड करणे महत्त्वाचे आहे. सफरचंद, केळी,पेरू,डाळिंब यांसारखी ताजी फळे खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक साखर आणि  फायबर मिळतात. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि ऊर्जाही टिकून राहते. पाणी आणि द्रव पदार्थ जास्त घ्या.

निर्जळी उपवास शक्य नसलेल्यांसाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. नारळपाणी,  ताक, लिंबू सरबत यांसारखे पदार्थ शरीराला हायड्रेटेड ठेवतात. उपवासासाठी चालणाऱ्या भाज्या, जसे की बटाटा, रताळं, अळू यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. सुकामेवा आणि बियांचा आहारात समावेश करा. बदाम, अक्रोड, पिस्ता यांसारखे सुकामेवा आणि भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने शरीराला आवश्यक फॅट्स आणि प्रोटीन मिळतात. यामुळे भूक नियंत्रणात राहते.

उपवासाच्या दिवशी काय टाळावे? (What Should Avoid While Fasting)

तळलेले पदार्थ जसं की साबुदाणा वडा, बटाटा भजी यांसारखे तळलेले पदार्थ पचायला जड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी करू शकतात. जास्त साखर असलेले पदार्थ खाऊ नका. मिठाई किंवा जास्त साखर असलेले पदार्थ टाळा. ते क्षणिक ऊर्जा देतात, पण नंतर थकवा वाढवतात. प्रक्रिया केलेले पदार्थ नकोतच. पॅकबंद किंवा प्रक्रिया केलेले उपवासाचे पदार्थ टाळा त्यात प्रिझर्वेटिव्ह आणि अतिरिक्त मीठ असू शकतं.

चहा आणि कॉफी कमी प्रमाणात घ्या. निर्जळी उपवास करत असाल तर चहा-कॉफी टाळा,कारण त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. हरतालिकेचा उपवास करताना आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. उपवासाचा मुख्य उद्देश शरीराला डिटॉक्स करणं आहे. म्हणूनच, योग्य पदार्थांची निवड करून तुम्ही हा दिवस निरोगी आणि उत्साहात साजरा करू शकता.

Web Title: Hartalika teej 2025 : Hartalika Fasting Rules Food Rules To Follow While Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.