lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > हरतालिकेच्या उपवासाला काय खायचं काय नाही? ५ नियम, उपवास फळेल-आरोग्य राहील चांगले

हरतालिकेच्या उपवासाला काय खायचं काय नाही? ५ नियम, उपवास फळेल-आरोग्य राहील चांगले

Hartalika Teej 2023 : उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून उपवास सोडावा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:25 AM2023-09-18T10:25:21+5:302023-09-18T11:01:45+5:30

Hartalika Teej 2023 : उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून उपवास सोडावा.

Hartalika Teej 2023 :  Does and don'ts of hartalika upwas what to avoid during the hartalika teej fast | हरतालिकेच्या उपवासाला काय खायचं काय नाही? ५ नियम, उपवास फळेल-आरोग्य राहील चांगले

हरतालिकेच्या उपवासाला काय खायचं काय नाही? ५ नियम, उपवास फळेल-आरोग्य राहील चांगले

हरतालिकेच्या ( Hartalika Teej 2023) दिवशी सर्व विवाहीत महिला आणि काही घरांमध्ये कुमारीका व्रत ठेवून पूजा करतात. गणोशोत्सवांची  बाकीची कामं, घरातलं ऑफिसचं काम या सगळ्यात खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतो. याचा तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून काय खायचं काय, काय टाळायचं समजून घेऊया. (Does and don'ts of hartalika upwas) ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील.

उपवासाच्या दिवशी काय खायचं?

1) काही महिला निर्जळी उपवास करतात, परंतु अशा स्थितीत उपवास सोडताना केवळ आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे, जेणेकरून दिवसभराचा थकवा आणि अशक्तपणा दूर होईल. तुम्ही उपवास सोडण्यासाठी दह्याचे सेवन करू शकता.

कंबर, मागचा भाग खूप वाढलाय? १० मिनिटं-४ योगासनं; १५ दिवसांत पाहा फरक

२) या व्रताच्यादिवशी तुम्ही पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता

३)  नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणार्‍या इतर द्रवांचे सेवन करू शकता.बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता.

४) उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून उपवास सोडावा.

५) तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. यामुळे डोकेदुखी किंवा मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. बाहेरचे पदार्थ खाणं टाळावे. 

उपवास करताना ५ गोष्टी लक्षात ठेवा

१) उपवासाच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यामुळे कोणचेही मन दुखावणार नाही याची काळजी घ्या.

२) घरात आणि बाहेर सगळ्याची प्रेमाने बोला. घरातील ज्येष्ठांची सेवा करा, त्यांना आनंदी ठेवा असे केल्याने उपवास यशस्वी होतो.

कोण म्हणतं प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो? 'हे' ६ व्हेज पदार्थ खा, हाडं-मसल्स होतील मजबूत

३) उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही. कोणाही बद्दल द्वेषाची भावना मनात नसावी.

Web Title: Hartalika Teej 2023 :  Does and don'ts of hartalika upwas what to avoid during the hartalika teej fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.