Lokmat Sakhi >Food > हरतालिका 2025 : उपवासाला करा साबुदाण्याची तिखट लापशी, झटपट होणारा पौष्टिक पदार्थ-दिवसभर लागणार नाही भूक

हरतालिका 2025 : उपवासाला करा साबुदाण्याची तिखट लापशी, झटपट होणारा पौष्टिक पदार्थ-दिवसभर लागणार नाही भूक

Hartalika 2025: Make spicy sago recipe during fasting, a quick nutritious dish - you won't feel hungry all day long : दही साबुदाणा किंवा साबुदाण्याची तिखट लापशी करायची सोपी रेसिपी. उपासाला नक्की करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 17:07 IST2025-08-21T17:05:28+5:302025-08-21T17:07:18+5:30

Hartalika 2025: Make spicy sago recipe during fasting, a quick nutritious dish - you won't feel hungry all day long : दही साबुदाणा किंवा साबुदाण्याची तिखट लापशी करायची सोपी रेसिपी. उपासाला नक्की करा.

Hartalika 2025: Make spicy sago recipe during fasting, a quick nutritious dish - you won't feel hungry all day long | हरतालिका 2025 : उपवासाला करा साबुदाण्याची तिखट लापशी, झटपट होणारा पौष्टिक पदार्थ-दिवसभर लागणार नाही भूक

हरतालिका 2025 : उपवासाला करा साबुदाण्याची तिखट लापशी, झटपट होणारा पौष्टिक पदार्थ-दिवसभर लागणार नाही भूक

साबुदाणा हा महाराष्ट्रात घरोघरी केला जाणारा एक खास पदार्थ आहे. उपवासाच्या दिवशी तर साबुदाण्याला फार महत्व असते.  तर त्याला वेगळंच महत्त्व आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना साबुदाण्याच्या पदार्थांची चव आवडते. (Hartalika 2025: Make spicy sago recipe during fasting, a quick nutritious dish - you won't feel hungry all day long)साबुदाणा पचायला हलका आणि ऊर्जा देणारा असल्याने तो उपवासात खाल्ला जातो. साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. साबुदाण्याची खिचडी सगळ्यांच्याच आवडीची असते. तसेच साबुदाण्याचे वडे आणि थालीपीठही आवडीने खाल्ले जाते. त्याच प्रमाणे इतरही काही पदार्थ करता येतात त्यापैकी एक म्हणजे साबुदाण्याची तिखट लापशी. करायला अगदी सोपी आहे आणि पोटभरीचा पदार्थ आहे. नक्की करुन पाहा.  

साहित्य 
साबुदाणा, पाणी, दही, हिरवी मिरची, तूप, जिरं

कृती
१. साबुदाणा रात्री भिजत घालायचा. सकाळी त्याचे पाणी काढून टाकायचे आणि दोनदा पाण्यातून धुवायचा. त्यानंतर एका पातेल्यात पाणी घ्यायचे त्यात थोडे दही घायाचे. जास्त नाही अगदी थोडे दही घ्या. त्यात साबुदाणा घालायचा आणि गॅसवर गरम करायचे. पाच मिनिटे साबुदाणा उकळवायचा.  नंतर त्यातील पाणी  जरा कमी करायचे. साबुदाणा गार होऊ द्यायचा. 

२. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. एका खोलगट पातेल्यात दही घ्यायचे. त्यात चमचाभर मीठ घालायचे. हदी जरा फेटायचे आणि त्यात थोडे पाणी घालायचे. त्यात साबुदाणा घालायचा आणि भिजू द्यायचा. साबुदाणा झाकून ठेवायचा. 

३. फोडणीपात्रात तूप घ्यायचे. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालायचे. जिरं तडतडल्यावर  त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि छान परतायचे. मग ती फोडणी साबुदाण्यावर ओतायची. एकजीव करायचे. व्यवस्थित ढवळून घ्यायचे. नुसते खायला मस्त लागते आणि वरीच्या भातासोबतही एकदम मस्त लागते. 

त्यात कोथिंबीर घालू शकता. मात्र सगळेच उपासाला कोथिंबीर खात नाहीत. त्याचप्रमाणे लाल तिखट, आलं, उकडलेले बटाटे घालू शकता. त्याची चवही मस्त लागते. नाश्त्यासाठी करु शकता तसेच जेवणासाठीही करु शकता.    

Web Title: Hartalika 2025: Make spicy sago recipe during fasting, a quick nutritious dish - you won't feel hungry all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.