ताज्या, हिरव्या हरभऱ्याची भाजी खायला खूपच चवदार आणि उत्तम लागते. ही भाजी तुम्ही आवडीनुसार तिखट थोडी आंबट बनवू सकता. आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेली भाजी अनेक घरांमध्ये थंडीत बनवली जाते. ( How To Make Harbhara Leaves Bhaji) हरभऱ्याची पानं कोवळी असतानाच काढून नंतर सुकवून किंवा त्याची चविष्ट पालेभाजी तयार केली जाते. खासकरून ग्रामीण भागात ही भाजी आवडीनं बनवली जाते. तुम्ही गॅसवर बनवण्यापेक्षा चुलीवर ही भाजी केली तर हरभऱ्याच्या भाजीची चव खूपच छान लागते. (Harbhara Bhaji Recipe)
ही भाजी करण्यासाठी पूर्वतयारी काय करावी लागते?
हरभऱ्याची भाजी करण्यासाठी प्रामुख्यानं ताजी हिरवी पानं स्वच्छ धुवून घ्या नंतर बारीक चिरून घ्या. यामध्ये चवीसाठी तुम्ही मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घालू शकता. पण हरभऱ्याची डाळ तुम्हाला आधी थोडी शिजवून घ्यावी लागेल. अन्यथा ती कच्ची राहू शकते.
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या उपवासाठी करा मऊ साबुदाणा खिचडी; ५ टिप्स-परफेक्ट होईल खिचडी
फोडणीसाठी भरपूर लसूण, कांदा, हिरवी मिरची, मोहरी यांचा वापर केला जातो. काही ठिकाणी भाजीला दाटपणा येण्यासाठी थोडं बेसन हरभऱ्याचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वरून घातलं जातं. ज्याला पिठलं भाजी किंवा गरगटी भाजी असंही म्हणतात.
हरभऱ्याची भाजी करण्याची सोपी कृती
सगळ्यात आधी कढईत तेल गरम करून घ्या. त्यात जिरं, मोहरी आणि भरपूर ठेचलेला लसूण आणि मिरच्यांची फोडणी द्यावी. फोडणी तयार केली की त्यात भिजवलेली डाळ परतवून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेली हरभऱ्याची भाजी घालून चवीनुसार मीठ घाला.
महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाऊ शकतो का? वरीचे तांदूळ या उपवासाला चालतात का?
भाजी नेहमी वाफेवर शिजवणं उत्तम ठरतं. पण गरज वाटली तर तुम्ही पाण्याचा हबका मारू शकता. भाजी अर्धवट शिजली की त्यावर थोडं दाण्याचं कूट घाला किंवा बेसन घालून ५ ते १० मिनिटं झाकण ठेवून वाफ काढा. हिरव्यागार हरभऱ्याची ही भाजी ज्वारीची भाकरी, चपातीसोबत खायला उत्तम आहे. यासोबत तुम्ही तोंडी लावणीसाठी लसणाची चटणी किंवा तिळाची चटणी खाऊ शकता. लोहानं परिपूर्ण असलेली ही भाजी खाल्ल्यानं पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणाला झटपट ही भाजी तुम्ही करू शकता.
Web Summary : Enjoy fresh chickpea leaves bhaji, a nutritious winter dish. Prepare by sautéing mustard seeds, garlic, and chilies, then adding chickpea leaves and spices. Cook until tender, optionally adding peanut powder or gram flour for thickness. Serve hot with jowar roti.
Web Summary : ताज़ी चने की पत्ती भाजी का आनंद लें, एक पौष्टिक शीतकालीन व्यंजन। सरसों के बीज, लहसुन और मिर्च को भूनकर, फिर चने की पत्ती और मसाले डालकर तैयार करें। नरम होने तक पकाएं, वैकल्पिक रूप से गाढ़ापन के लिए मूंगफली पाउडर या बेसन डालें। ज्वार की रोटी के साथ गरमागरम परोसें।