Guava leaf tea benefits : पेरू फक्त चविष्ट फळ नाही, तर त्याच्या पानांमध्ये देखील भरपूर औषधी गुण असतात. खासकरून दृष्टी वाढवण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी पेरूच्या पानांचा चहा खूप फायदेशीर मानला जातो. यात असलेले व्हिटामिन A, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक डोळ्यांना पोषण देतात, थकवा कमी करतात आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांपासून बचाव करतात. अशात घरच्या घरी हा सोपा आणि तब्येतीसाठी फायदेशीर कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
पेरूच्या पानांच्या चहाचे फायदे
व्हिटामिन A भरपूर असतं
पेरूच्या पानातील व्हिटामिन A रेटिना मजबूत करतं आणि नाइट ब्लाइंडनेस कमी करण्यास मदत करतं.
अँटी-ऑक्सिडंट तत्व
हे फ्री रॅडिकल्सपासून डोळ्यांचे संरक्षण करतात, ज्यामुळे मोतीबिंदू आणि वृद्धापकाळातील डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.
डोळ्यांचा थकवा कमी होतो
जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने होणारा थकवा आणि कोरडेपणा कमी करण्यास हा चहा उपयोगी आहे.
सूज आणि लालसरपणात आराम
यातील सूज-रोधी गुणधर्म डोळ्यांची जळजळ, लालसरपणा आणि अस्वस्थता कमी करतात.
पेरूच्या पानांचा चहा बनवण्याची पद्धत
ताजी आणि हिरवी पेरूची पानं घ्या, ती स्वच्छ धुवून धूळ किंवा कीटकनाशक पूर्णपणे काढून टाका. एका पातेल्यात २–३ कप पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळायला लागताच त्यात पेरूची पानं टाका. मंद आचेवर ७–८ मिनिटे उकळा, जेणेकरून पानांचे सर्व पोषक तत्व पाण्यात मिसळतील. गॅस बंद करून हा काढा गाळून घ्या. चवीसाठी थोडं मध किंवा लिंबाचा रस घालू शकता. गरमागरम चहा हळूहळू प्या.
