Join us

वरण भात आणि पेरूची आंबट गोड चटणी; जमेल फक्कड बेत! भाजलेल्या पेरुची चटकदार चटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:14 IST

Guava Chutney Recipe : चपातीबरोबर किंवा वरणभाताबरोबर खाण्यासाठी पेरूची चटणी.

थंडीच्या दिवसात हिरवेगार पेरू बाजारात पाहायला मिळतात. तिखट मीठ लावून पेरु खायची मजाच काही वेगळी.  रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये तुम्ही पेरुचा वापर करू शकता. (Guava Chutney Recipe)  चपातीबरोबर किंवा वरणभाताबरोबर खाण्यासाठी पेरूची चटणी हा उत्तम बेत तयार होतो. पेरूची चटणी बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Cooking Tips & Hacks)

पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, फॉलिक अॅसिड, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज यांसारखी खनिजे पेरूमध्ये आढळतात. पेरूमध्ये कॅरोटीनोइड्स आणि पॉलीफेनॉल आढळतात जे त्यांना वृद्धत्वविरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांसह केस आणि त्वचा सुधारण्यास मदत करतात.

फक्त ४ टोमॅटो वापरून करा १०० पेक्षा जास्त कुरकुरीत पापड; ही घ्या इंस्टंट पापड रेसेपी

डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यामते पिरीएड्स क्रॅम्प, एसिडीटी, डायबिटीज, तोंडाच्या समस्या, केसांच्या समस्यांसाठी  पेरूचा वापर केला जातो. वजन कमी करण्यासाठी आणि जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यासाठी पेरू फळ म्हणून खाणे हा सर्वोत्तम आहार आहे. पेरू खाल्ल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स  भरपूर असल्याने ते त्वचा आणि केसांसाठी देखील उपयुक्त आहे. पीरियड क्रॅम्प्सपासून ते मायग्रेनपर्यंत सर्व प्रकारच्या वेदनांवरही पेरू गुणकारी आहे. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स