Join us
Daily Top 2Weekly Top 5

बटाट्याचा थोडा भाग हिरवा असेल तर तो कापून बाकीचा बटाटा खाल्ला तर काय बिघडतं? डॉक्टर सांगतात, काय होतं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:35 IST

Green Potato : बटाटे हे जमिनीखाली येतात, पण जेव्हा त्याचा काही भाग जमिनीच्या वर येतो तेव्हा त्यावर सूर्यकिरणं पडतात. ज्यामुळे त्यात क्लोरोफिल तयार होतं. याच कारणाने बटाट्याचा काही भाग हिरवा दिसू लागतो. 

Green Potato : जेव्हा आपण बाजारात बटाटे घेण्यासाठी जातो तेव्हा पाहिलं असेल की, काही बटाट्यांचा थोडा भाग हिरवा दिसतो. आपण नेहमीच याला नॉर्मल समजून दुर्लक्ष करतो. बटाट्याचा हिरवा भागही भाजीत तसाच वापरला जातो किंवा काही लोक हिरवा भाग कापून फेकतात आणि बाकी भागाचा वापर करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, असा बटाटा आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. बटाटे हे जमिनीखाली येतात, पण जेव्हा त्याचा काही भाग जमिनीच्या वर येतो तेव्हा त्यावर सूर्यकिरणं पडतात. ज्यामुळे त्यात क्लोरोफिल तयार होतं. याच कारणाने बटाट्याचा काही भाग हिरवा दिसू लागतो. डॉक्टर बृजपाल त्यागी यांनी याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

बटाट्याचा हिरवा भाग खाणं नुकसानकारक

अनेक एक्सपर्ट वेळोवेळी सांगत असतात की, बटाट्याचा हा हिरवा रंग केवळ सामान्य बदल नाही तर तो मोठ्या आजाराचं कारणही ठरू शकतो. बटाट्यामध्ये तयार झालेल्या क्लोरोफिलच्या प्रभावाने त्यात 'सोलानाइन' नावाचं एक घातक न्यूरोटॉक्सिन तयार होतं. हे न्यूरोटॉक्सिन आपल्या शरीराचं मोठं नुकसान करू शकतं. जर हे पोटात गेलं तर आपल्या नसा डॅमेज होऊ शकतात आणि आपलं हृदय व लिव्हरचं देखील नुकसान होऊ शकतं. 

हिरवा भाग काढून बटाटा खाणं योग्य? 

जेव्हा आपण बाजारातून बटाटे आणतो, तेव्हा आपण काळजी घेणं गरजेचं ठरतं. हिरवे पडलेले बटाटे बाकीच्या बटाट्यांपासून वेगळे ठेवले पाहिजे. जेव्हा आपण हिरवा बटाटा कापतो, तेव्हा सालीवर आपल्याला एक हिरवा थर दिसतो. बटाट्याचा हा हिरवा भाग खाण्यासाठी अजिबात वापरू नये. खाण्यासाठी नेहमीच बटाट्याचा साफ आणि सामान्य भागचा वापरायला हवा.

फास्ट फूडमध्येही असतं विषारी सोलानाइन 

हल्ली फास्ट फूड खाण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. पण यांमध्ये काय काय घातक तत्व असतात याचा कधी विचार केला जात नाही. फास्ट फूडमध्ये वापरले जाणारे बटाटे कशाप्रकारचे असतात हेही आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे शक्यता आहे की, फास्ट फूडच्या माध्यमातूनही घातक सोलानाइन न्यूरोटॉक्सिन आपल्या शरीरात प्रवेश करू शकतं. 

अशात आता पुढच्या वेळी जेव्हा बाजारात बटाटे घेण्यासाठी गेलात तर या गोष्टी लक्षात ठेवा. पहिला सल्ला हा आहे की, छोटे किंवा मध्यम आकाराचे बटाटे घ्या आणि दुसरी बाब म्हणजे काही भाग हिरवा असलेले बटाटे अजिबात घेऊ नका. इतकी जरी काळजी घेतली तर मोठा धोका टळू शकतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Green potato: Cut the green part and eat? Doctor explains!

Web Summary : Green potatoes contain solanine, a neurotoxin harmful to health. Experts advise against consuming the green part, as it can damage nerves, the heart, and the liver. Choose small to medium-sized potatoes and avoid those with green parts to minimize risk.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य