खिचू , खिच किंवा इतर विविध नावांनी ओळखली जाणारी ही गव्हाची उकड चवीला एकदम मस्त लागते. गव्हाच्या पीठापासून तयार होणारा हा पदार्थ शरीराला ऊर्जा देणारा आहे. गहू हे संपूर्ण धान्य असल्यामुळे त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने तसेच लोह, मॅग्नेशियम आणि बी-समूहातील जीवनसत्वे नैसर्गिकरीत्या असतात. त्यामुळे खेचू खाल्ल्यावर लगेच पोट भरल्यासारखे वाटते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. (Good for the stomach food! A special traditional dish for cold weather - nutritious and easy to digest - a soft and chewy dish)हा पदार्थ पचनासाठी हलका असतो. आजारी व्यक्ती, वृद्ध मंडळी किंवा पोट बिघडल्यावर जड पदार्थ टाळायचे असतील तेव्हा गव्हाचा खेचू उपयुक्त ठरतो. फार तिखट किंवा मसालेदार नसल्यामुळे पोटावर ताण येत नाही आणि आतड्यांना आराम मिळतो.
गव्हाच्या पीठातील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर असा साधा पदार्थ पोट साफ होण्यासाठी उपयोगी ठरु शकतो. याशिवाय फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठीही मर्यादित प्रमाणात हा पदार्थ चालू शकतो. खेचू हा शरीराला उष्णता देणारा मानला जातो. थंडीच्या दिवसांत हा पदार्थ खाल्ल्याने उब मिळते. त्यामुळे हिवाळ्यात अनेक घरांमध्ये गव्हाच्या खेचू केला जातो. पाहा ही पौष्टिक रेसिपी कशी करावी.
साहित्य
गव्हाचे पीठ, पाणी, तूप, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, जिरे, हिंग, सोडा, लाल तिखट, मीठ
कृती
१. छान ताजी कोथिंबीर जुडी घ्यायची. कोथिंबीर निवडायची आणि धुवायची. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. आल्याचा लहान तुकडा घ्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, भरपूर कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा घ्यायचा. त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करायची.
२. एका खोलगट पातेल्यात गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यात पाणी घालून ढवळत राहायचे. जरा मध्यम पातळ असे मिश्रण तयार करायचे. घट्ट नको पातळच करा. फक्त अगदी पाण्यासारखे पातळ नको. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. तयार केलेली पेस्ट त्यात ओतायची. ढवळत राहायचे. छान एकजीव करायची. मिश्रण हिरवट दिसायला लागेल. मग त्यात चमचाभर सोडा घाला. थोडे हिंग घाला तसेच जिरेही घाला. चवीपुरते मीठ घाला, आवडीनुसार लाल तिखट घाला आणि शेवटी खायचा सोडा घाला, ढवळून घ्यायचे.
३. एका कढईत तयार केलेले मिश्रण घ्यायचे. त्यात चमचाभर तूप घालायचे. २० मिनिटे ते ढवळत राहा आणि जरा घट्ट होऊ द्या. कमी वेळातही होते पण मग त्याची चव फार छान लागत नाही. त्यामुळे जास्त वेळ शिजू द्यायचे. झाकण ठेवा आणि पाच मिनिटे वाफवा. नंतर गरमागरम खायला घ्या. त्यात वरतून कच्चे तेल घाला. लाल तिखट घाला.
