Join us

मनुका की बेदाणे- काय खाणं तब्येतीसाठी जास्त फायद्याचं? पाहा मनुका-बदाम खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:22 IST

Golden Raisins Vs Black Raisins : मनुका की बेदाणे- काय खाणं तब्येतीसाठी जास्त फायद्याचं?

मनुके (Raisins) खाणं तब्येतीसाठी उत्तम मानलं जातं. खासकरून लोक रात्रभर भिजवलेले मनुके खातात. मनुके खाण्याचे बरेच फायदे आहेत. मनुक्यांमध्येही प्रकार असतात. पिवळे मनुके, काळे मनुके. अधिकाधिक लोक या दोन्ही मनुक्यांमधील फरकाबाबत गोंधळलेले असतात. लोकांच्या मनात प्रश्न असतात की कोणते मनुके तब्येतीसाठी उत्तम ठरतात. अलिकडेच न्युट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Golden Raisins Vs Black Raisins Nutritional Value Which color Raisins Are Healthiest Know From Experts)

एक्सपर्ट्स काय सांगतात

व्हिडीओमध्ये न्युट्रिशनिस्ट सांगतात की काळे आणि पिवळे मनुके तब्येतीसाठी उत्तम ठरतात. या दोन्हींमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स आणि फायबर्सचे प्रमाण चांगले असते. काळ्या मनुक्यांमध्ये हे प्रमाण थोडे जास्त असते.

पिवळे मनुके खाण्याचे फायदे

पिवळे किंवा गोल्डन मनुके सल्फर डायऑक्साईडयुक्त असतात. म्हणून त्याचा रंग हलका पिवळा असतो. न्युट्रिशनिस्ट दीपाशिखा जैन यांच्यामते हे थायरॉईडच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरते. म्हणून रिकाम्या पोटी खाल्ल्यास बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे थायरॉईड लेव्हल संतुलित राहण्यासही मदत होते.

काळे मनुके खाण्याचे फायदे

काळे मनुके आयर्नचा एक उत्तम स्त्रोत आहेत. जर कोणाच्याही शरीरात रक्ताची कमतरता असेल तर रोज ६ ते ७ काळे मनुके पाण्यात भिजवून खायला हवेत. ज्यामुळे हिमोग्लोबीनचा स्तर वाढतो आणि कमकुवतपणा दूर होतो.

वजन कमी करण्यासाठी उत्तम

जर तुम्ही फिटनेस किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर दोन्ही प्रकारचे मनुके आपल्या आहारात ठेवा. हे नॅच्युरल स्विटनरप्रमाणे काम करते ज्यामुळे शुगर क्रेव्हिंग्स कमी होतात. त्वचेसाठी फायदेशीर ठरते. हे त्वचेसाठी एक उत्तम एंटी एजिंग फूड आहे. कारण यातील एंटी ऑक्सिडेंट्स सुरकुत्या कमी करतात आणि त्वचा हेल्दी ठेवून त्वचेवरील ग्लो टिकवून ठेवतात.

काळ्या मनुक्यांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असते. काळे मनुके खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. त्वचा ग्लोईंग बनते. रोज ६ ते ८ मनुके खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Black vs. Golden Raisins: Which is healthier and aids weight loss?

Web Summary : Both black and golden raisins offer health benefits. Black raisins are rich in iron and antioxidants, beneficial for anemia and detoxification. Golden raisins may help balance thyroid levels. Both support weight loss and skin health.
टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न