Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > डिंक आणि गोंद कतीरा दोन्ही सारखेच वाटतात? पाहा काय फरक असतो , उन्हाळ्यात गोंद कतीरा आहारात हवाच कारण ....

डिंक आणि गोंद कतीरा दोन्ही सारखेच वाटतात? पाहा काय फरक असतो , उन्हाळ्यात गोंद कतीरा आहारात हवाच कारण ....

Goan and Goand katira are same or not ? See what the difference is, summer food : उन्हाळ्यात नक्की खा गोंद कतीरा फक्त आधी फरक समजून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2026 15:05 IST2026-03-29T15:01:10+5:302026-03-29T15:05:18+5:30

Goan and Goand katira are same or not ? See what the difference is, summer food : उन्हाळ्यात नक्की खा गोंद कतीरा फक्त आधी फरक समजून घ्या.

Goan and Goand katira are same or not ? See what the difference is, summer food | डिंक आणि गोंद कतीरा दोन्ही सारखेच वाटतात? पाहा काय फरक असतो , उन्हाळ्यात गोंद कतीरा आहारात हवाच कारण ....

डिंक आणि गोंद कतीरा दोन्ही सारखेच वाटतात? पाहा काय फरक असतो , उन्हाळ्यात गोंद कतीरा आहारात हवाच कारण ....

उन्हाळा सुरु झाला की शरीराला थंडावा देणार्‍या पदार्थांची गरज अधिक जाणवते. उष्णतेमुळे थकवा, अंगात उष्णता वाढणे, डोके गरगरणे असे त्रास टाळण्यासाठी आहारात काही नैसर्गिक थंड पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते, अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे गोंद कतीरा. (Goan and Goand katira are same or not ? See what the difference is, summer food )साधा पण गुणकारी पदार्थ उन्हाळ्यात उपयोगी ठरतो.

गोंद कतिरा हा वनस्पतीपासून मिळणारा नैसर्गिक गम असून त्याची खासियत म्हणजे तो पाण्यात भिजवल्यावर फुलून जेलीप्रमाणे होतो. तो थंड असल्यामुळे तो शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो. उन्हामुळे होणारी जळजळ, थकवा, डोकेदुखी यावर तो उपयोगी ठरतो. त्यामुळे सरबत, फालूदा किंवा साध्या पाण्यात भिजवूनही तो आहारात घेता येतो. विशेष म्हणजे, तो शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो आणि उष्णतेचा त्रास कमी करतो.

अनेकजण गोंद कतीरा आणि डिंक यामध्ये गोंधळ करतात. दोन्ही पदार्थ दिसायला साधारण सारखे वाटत असले तरी त्यांच्यात मूलभूत फरक आहे. डिंक हा झाडांच्या सालीतून मिळणारा गम असून तो गरम असतो. त्यामुळे तो प्रामुख्याने हिवाळ्यात वापरला जातो. डिंक तळल्यावर फुलतो आणि त्याचा वापर लाडू किंवा इतर पौष्टिक पदार्थांमध्ये केला जातो. शरीराला उष्णता आणि ताकद देण्यासाठी तो उपयुक्त मानला जातो.

गोंद कतीरा आणि डिंक यामधील फरक ओळखण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवता येतात. गोंद कतीरा पाण्यात भिजवल्यावर पारदर्शक, जेलीप्रमाणे मऊ आणि फुगलेला दिसतो, तर डिंक पाण्यात तसा फुगत नाही. उलट डिंक गरम तेलात किंवा तुपात टाकल्यावर फुलतो. गोंद कतीरा थंड पेयांमध्ये वापरला जातो, तर डिंक गोड पदार्थ किंवा लाडूंमध्ये वापरला जातो.

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी गोंद कतीराचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणे फायदेशीर ठरु शकते. मात्र, कोणताही पदार्थ प्रमाणातच खावा हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योग्य पदार्थ योग्य ऋतूत आणि योग्य पद्धतीने घेतल्यास त्याचे फायदे नक्कीच मिळतात. एकंदरीत, गोंद कतिरा आणि डिंक यामधील फरक समजून घेतल्यास गोंधळ टाळता येतो आणि आपल्या आरोग्यासाठी योग्य पदार्थाची निवड करता येते. उन्हाळ्यात थंडावा देणारा गोंद कतीरा आणि हिवाळ्यात ताकद देणारा डिंक, दोन्हीही आपल्या आहारात महत्त्वाचे आहेत, फक्त त्यांचा वापर योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

Web Title : गोंद कतीरा बनाम डिंक: अंतर जानें, गर्मी में स्वास्थ्य लाभ

Web Summary : गोंद कतीरा, एक ठंडा गम, डिंक से अलग है। कतीरा गर्मी में शरीर को ठंडा करता है, हीटस्ट्रोक को रोकता है, जबकि डिंक सर्दियों में गर्मी प्रदान करता है। इनका उपयोग उसी अनुसार करें।

Web Title : Gond Katira vs. Dink: Know the Difference, Summer Health Benefits

Web Summary : Gond Katira, a cooling gum, differs from Dink. Katira cools the body in summer, preventing heatstroke, while Dink provides warmth in winter. Use them accordingly.