Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Diwali 2025: दिवाळीसाठी यंदा घरी केलेले चॉकलेट्स भेट म्हणून द्या, पौष्टिक आणि करायला सोपे, लहान मुलांसाठी मेजवानीच

Diwali 2025: दिवाळीसाठी यंदा घरी केलेले चॉकलेट्स भेट म्हणून द्या, पौष्टिक आणि करायला सोपे, लहान मुलांसाठी मेजवानीच

Give homemade chocolates as gifts this Diwali, nutritious and easy to make, a feast for kids : चवीला एकदम मस्त आणि करायला सोपे हेल्दी चॉकलेट्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2025 16:49 IST2025-10-10T16:48:22+5:302025-10-10T16:49:57+5:30

Give homemade chocolates as gifts this Diwali, nutritious and easy to make, a feast for kids : चवीला एकदम मस्त आणि करायला सोपे हेल्दी चॉकलेट्स.

Give homemade chocolates as gifts this Diwali, nutritious and easy to make, a feast for kids | Diwali 2025: दिवाळीसाठी यंदा घरी केलेले चॉकलेट्स भेट म्हणून द्या, पौष्टिक आणि करायला सोपे, लहान मुलांसाठी मेजवानीच

Diwali 2025: दिवाळीसाठी यंदा घरी केलेले चॉकलेट्स भेट म्हणून द्या, पौष्टिक आणि करायला सोपे, लहान मुलांसाठी मेजवानीच

दिवाळीला नातेवाईकांकडे जाताना किंवा मित्रपरीवाला भेटताना काहीतरी गोड घेऊन जावे असा काही नियम नसला तरी अनेक जण तसं करतात. तसेच लहान मुलांसाठी चॉकलेटचे डब्बे अनेक जण नेतात. चॉकलेटमुळे दातही किडतात आणि वजनही प्रचंड वेगाने वाढते. पण लहान मुलांना चॉकलेट खूप आवडते. (Give homemade chocolates as gifts this Diwali, nutritious and easy to make, a feast for kids)बाजारात मिळणाऱ्या चॉकलेटमध्ये साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात, जे आरोग्यासाठी चांगले नाहीत. त्यामुळे घरच्या घरी बनवलेले हेल्दी चॉकलेट हे उत्तम पर्याय ठरते. ही चॉकलेट्स मुलांना आवडतातच, पण त्याचबरोबर त्यात पौष्टिक घटकही असतात. मुळात चॉकलेटची चव फार कडू असते. तसेच आरोग्यासाठी साधे चॉकलेट चांगले मानले जाते. त्यामुळे घरी तयार केलेले साखर नसलेले चॉकलेट मुलांना द्या. 

साहित्य
कोको पावडर, नारळ तेल किंवा तूप, खजूर, दूध, मध, सुकामेवा 

१. सगळ्यात आधी खजूर कोमट दुधात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. त्यासाठी खजूर दहा मिनिटे भिजवले तरी पुरेसे आहे. भिजवलेले खजूर मिक्सरमधून वाटून घ्यायचे. नंतर पॅनमध्ये नारळ तेल गरम करुन त्यात कोको पावडर, खजूर पेस्ट घाला. मंद आचेवर ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाले की त्यात बारीक चिरलेले बदाम, काजू किंवा अक्रोड घालून ढवळून घ्या. मिश्रण गार करत ठेवा. गार झाल्यावर ते साच्यात भरा. आणि फ्रीजमध्ये सेट केले तरी चालते. काही वेळातच स्वादिष्ट आणि पौष्टिक चॉकलेट तयार होते.

२. साचा नसेल तर त्याऐवजी खोलगट ताटलीमध्ये मिश्रण पसरवा आणि त्याचे तुकडे करुन घ्या.त्यात मधही घालू शकता. इतरही अनेक पौष्टिक पदार्थ घालता येतात. 

या हेल्दी चॉकलेटचे अनेक फायदे आहेत. खजूरामध्ये लोह, फायबर आणि नैसर्गिक गोडपणा असतो. नारळ तेल आणि तूप मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त असतात. कोको पावडरमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि मूड चांगला राहतो. सुकामेवा प्रोटीन आणि चांगल्या फॅट्सचा स्रोत आहे.

या चॉकलेटमध्ये साखर किंवा केमिकल्स नसल्यामुळे ती मुलांच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहेत. दररोज थोडेसे हे घरचे हेल्दी चॉकलेट दिल्यास मुलांना चवही मिळते आणि शरीरालाही आवश्यक पोषण मिळते. 

Web Title : दिवाली के लिए घर का बना चॉकलेट: स्वस्थ, आसान और बच्चों के लिए खास

Web Summary : इस दिवाली, घर का बना चॉकलेट उपहार में दें! ये दुकानों से बेहतर हैं, खजूर, मेवा और कोको से भरपूर हैं। सरल सामग्री से बनाना आसान, ये चॉकलेट बच्चों के लिए स्वादिष्ट और सुरक्षित हैं।

Web Title : Homemade Diwali Chocolates: Healthy, Easy, and a Kid-Friendly Treat

Web Summary : This Diwali, gift homemade chocolates! They're healthier than store-bought ones, packed with nutrients from dates, nuts, and cocoa. Easy to make with simple ingredients, these chocolates are a delicious and safe treat for kids.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.